तंत्रज्ञान निर्मितीसाठीची कल्पकता तरुणाईमध्ये ः डॉ. काकोडकर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तंत्रज्ञान निर्मितीसाठीची कल्पकता तरुणाईमध्ये ः डॉ. काकोडकर
तंत्रज्ञान निर्मितीसाठीची कल्पकता तरुणाईमध्ये ः डॉ. काकोडकर

तंत्रज्ञान निर्मितीसाठीची कल्पकता तरुणाईमध्ये ः डॉ. काकोडकर

sakal_logo
By

नेरूळ, ता.४ (बातमीदार) ः महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून नवी मुंबई महापालिकेच्या वतीने विष्णुदास भावे नाट्यगृहात ‘२१ व्या शतकातील विज्ञाननिष्ठ महाराष्ट्र’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाप्रसंगी ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. अनिल काको़डकर यांनी श्रोत्यांशी संवाद साधला. पत्रकार विनायक पात्रुडकर यांच्या प्रश्नांना त्यांनी उत्तरे दिली. तंत्रज्ञान निर्मितीसाठी आवश्यक बौद्धिक क्षमता आणि कल्पकता आपल्या तरुणाईमध्ये मोठ्या प्रमाणावर आहे. अशा नव्या संकल्पकांना प्रोत्साहन देण्याची गरज असल्याचे काकोडकर म्हणाले. या वेळी महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांची विशेष उपस्थिती होती.

या वेळी काकोडकर म्हणाले, आधुनिक काळाचा विचार करता शिक्षण हे विद्यार्थिकेंद्रीत असले पाहिजे. विविध ज्ञानशाखांच्या सीमा धूसर होत चालल्या असून विद्यार्थ्यांची आपल्या शैक्षणिक वाटचालीत विविध टप्प्यांवर ध्येये बदलू शकतात. विद्यार्थ्यांच्या मनात उपक्रमशीलता विकसित करणारे शिक्षण द्यायला हवे, असे डॉ. काकोडकर यांनी सांगितले.

या वेळी डॉ. होमी भाभा बाल वैज्ञानिक परीक्षेत द्वितीय क्रमांकाचे रौप्यपदक व बाल वैज्ञानिक किताब मिळवणाऱ्या नवी मुंबई महापालिका शाळा क्र. ३१, कोपरखैरणेचा विद्यार्थी अथर्व महेंद्र मोरे याचा अनिल काकोडकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे परीक्षेत मानांकन मिळविणारे वैदेही नवले, दीप्ती पाटील, अर्चना यादव, गणेश प्रसाद, नीतू यादव, सुमित चव्हाण, स्वदिप बनसोडे, गायत्री योगी, रितेश वाघमोडे, केदार भोसले या विद्यार्थ्यांना सन्मानचिन्हे प्रदान करून सन्मानित करण्यात आले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81099 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top