सेंट जॉर्ज रुग्णालय नॉन कोविड होणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सेंट जॉर्ज रुग्णालय नॉन कोविड होणार
सेंट जॉर्ज रुग्णालय नॉन कोविड होणार

सेंट जॉर्ज रुग्णालय नॉन कोविड होणार

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. ४ : राज्य सरकारच्या सेंट जॉर्ज रुग्णालयात गेली दोन वर्षे समर्पित कोविड रुग्णांवर उपचार केल्यानंतर आता येत्या आठवड्यात पूर्णपणे नॉन कोविड होण्याच्या मार्गावर आहे. यासंदर्भातील सर्व प्रक्रिया पूर्ण झाली असल्याची माहिती रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. आकाश खोब्रागडे यांनी दिली. ४६० खाटा असलेल्या या रुग्णालयाने कोविड साथ काळात सहा हजारांहून अधिक कोविड रुग्णांवर उपचार केले आहेत.
सेंट जॉर्ज रुग्णालय नॉन-कोविडमध्ये रूपांतरित करण्याची योजना आखली असून, भविष्यात कोविड रुग्णांसाठी ५० खाटा आणि आयसीयूचा समावेश असलेला एक प्रभाग आरक्षित ठेवणार आहेत. बाकी सर्व सुविधा नॉन कोविड केल्या जातील, अशी माहिती डॉ. खोब्रागडे यांनी दिली. रुग्णालयातील सर्व नॉन-कोविड कामे पुन्हा सुरू करण्यासाठी राज्य सरकारच्या अधिकृत परवानगीची प्रतीक्षा आहे. यानंतर आठवड्याअखेरीस नॉन-कोविड सुविधांमध्ये रूपांतरित केले जाईल. या रग्णालयात आतापर्यंत ६,६२७ कोविड रुग्णांवर उपचार केले; तर शेवटच्या तीन रुग्णांनादेखील डिस्चार्ज देण्यात आला आहे.
रुग्णालयात प्रसूती आणि स्त्री-रोग, ऑर्थोपेडिक, एमडी औषध, नेत्ररोग, कान-नाक-घसा आणि इतर अनेक विभाग आहेत. कोविड रुग्णांवर उपचार करताना सोशल डिस्टन्सिंगसाठी रुग्णालयाने ४६० पैकी फक्त ३२० खाटा उपचारांसाठी ठेवल्या होत्या. तसेच ओपीडीत साथीपूर्वी ८०० हून अधिक रुग्ण पाहिले जायचे आणि दररोज २० ते २५ रुग्ण दाखल होत असत. आम्ही दिवसातून १० ते १५ शस्त्रक्रिया करायचो, कधी कधी त्याहूनही जास्त होत होत्या. आता हे सर्व पुन्हा सुरू होणार असल्याचे रुग्णालयातील अधिकाऱ्याने सांगितले.

आयसीयू खाटा वाढवणार
सेंट जॉर्ज रुग्णालयातील तीन बाह्य रुग्ण कक्षांचे आयसीयू खाटांमध्ये रूपांतर केले होते. ज्यांची आता पूर्वीप्रमाणेच पुनर्रचना करण्यात आली आहे. कोविडपूर्वी हा १० खाटांचा आयसीयू वॉर्ड होता जो आता २० खाटांचा करण्यात येणार आहे. सध्या रुग्णालयात १०७ व्हेंटिलेटर आहेत, जे आता जे. जे. रुग्णालय, जी. टी., कामा आणि अलब्लेस मॅटर्निटी रुग्णालयात विभागले जातील.

१२ खाटांचे किडनी डायलिसीस युनिट
किडनीच्या आजाराने त्रस्त असलेल्या रुग्णांसाठी डायलिसिस सुविधा सुरू करण्याची आमची योजना आहे. आमच्याकडे जवळपास १२ डायलिसिस मशीन आहेत, ज्या किडनीच्या समस्या असलेल्या कोविड-पॉझिटिव्ह रुग्णांसाठी कोरोना काळात वापरल्या गेल्या होत्या. आता सर्वसामान्यांसाठी ते सुरू होणार आहे, असे अधीक्षक डॉ. आकाश खोब्रागडे यांनी सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81104 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top