मालवणीत भोंग्याविना अजान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मालवणीत भोंग्याविना अजान
मालवणीत भोंग्याविना अजान

मालवणीत भोंग्याविना अजान

sakal_logo
By

मालाड, ता. ४ (बातमीदार) ः भोंग्यावरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्र्वभूमीवर मालवणीतील अधिकतर मशिदींत फजरची अजान भोंग्याविना झाल्या. मालवणीत जवळपास २० छोट्या-मोठ्या मशिदी आहेत. मिळालेल्या माहितीनुसार मशीद प्रशासनाने स्वतःहून नियम पाळत अजान भोंग्याविना दिल्या. मात्र जोहर म्हणजे दुपारच्या नमाजासाठी भोंग्यावर अजान पठण करण्यात आले. मात्र या वेळी आवाज काही प्रमाणात कमी होता. तसेच मालवणी परिसरात कोठेही हनुमान चालिसा पठणाचा प्रयत्नदेखील झाल्याची माहिती नाही. त्यामुळे मालवणीत वातावरण शांत आहे. तसेच काल रमझान ईदचा सण शांततेत आणि उत्साहात पार पडला आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81110 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top