मनसे पदाधिकाऱ्यांना नोटीसा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मनसे पदाधिकाऱ्यांना नोटीसा
मनसे पदाधिकाऱ्यांना नोटीसा

मनसे पदाधिकाऱ्यांना नोटीसा

sakal_logo
By

मनोर, ता. ४ (बातमीदार) ः मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंगे हटवण्यासाठी मंगळवारपर्यंत दिलेल्या मुदतीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून सतर्कता बाळगण्यात आली. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मनोर आणि बोईसर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मशिदींसमोर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना सीआरपीसी कायद्याच्या कलम १४९ नुसार नोटिसा बजावण्यात आल्या.
मनोर पोलिस ठाणे हद्दीतील मनोर, मस्तान नाका, टेन नाका, टेन गाव, कटाळे आणि दहिसर तर्फे मनोर गावातील मशिदींसमोर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मनोर परिसरातील आठ मनसे पदाधिकाऱ्यांना सीआरपीसी कायद्याच्या कलम १४९ नुसार नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. अनुचित प्रकार रोखण्यासाठी मनोर पोलिस ठाण्यात चार अधिकारी, ४० कर्मचारी, नऊ होमगार्ड असे मनुष्यबळ उपलब्ध असल्याची माहिती पोलिस निरीक्षक प्रदीप कसबे यांनी दिली.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81115 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top