बोर्डीत पथसंचलन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बोर्डीत पथसंचलन
बोर्डीत पथसंचलन

बोर्डीत पथसंचलन

sakal_logo
By

बोर्डी, ता. ४ (बातमीदार) ः भोंग्यांचा विवादामुळे वातावरण तापलेले असताना बोर्डीत चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. घोलवड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रवींद्र पारखे व सहाय्यक पोलिस निरीक्षक मयूर शेवाळे यांच्या नेतृत्वाखाली बोर्डी गावात बुधवारी सकाळी ९ वाजता पोलिस पथकाने पथसंचलन केले. बोर्डी गावात १०० वर्षे जुनी मशीद आहे; मात्र येथे फक्त रमझान महिन्यात व ईद सणाच्या दिवशी अजान करण्यासाठी भोंग्याचा वापर केला जातो. याव्यतिरिक्त जवळजवळ ११ महिने भोंग्याचा वापर न करण्याची परंपरा येथील मुस्लिम बांधवांनी जपली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81120 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top