भिवंडीत कडेकोट पोलीस बंदोबस्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भिवंडीत कडेकोट पोलीस बंदोबस्त
भिवंडीत कडेकोट पोलीस बंदोबस्त

भिवंडीत कडेकोट पोलीस बंदोबस्त

sakal_logo
By

भिवंडी, ता. ४ (बातमीदार) ः महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंगे काढण्यासाठी ४ मेपर्यंतची मुदत दिली होती. त्यामुळे भिवंडी शहर परिसरात गेल्या दोन दिवसांपासून सर्वत्र कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. शहर परिसरात अनुचित प्रकार घडू नये यासाठी सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून मंगळवारी दुपारपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांना नोटिसा देण्यात आल्या, तर काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले. चार कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले असल्याची माहिती सहायक पोलिस आयुक्त प्रशांत ढोले यांनी दिली.
भिवंडी शहर परिसरात मुस्लिम समाज मोठ्या संख्येने आहे. या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्राबल्या नसले तरी राज ठाकरे यांना मानणारा विशिष्ट गट आहे. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिस यंत्रणा सतर्क होती. पोलिस उपायुक्त योगेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पोलिस पथक सकाळपासून शहरात गस्त घालत होते. शांतता समिती सदस्यांसह नागरिकांशी संवाद साधून अफवांवर विश्वास न ठेवता पोलिसांनी शांतता सुव्यवस्था ठेवण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले. शहरातील सर्व मशिदींचे ट्रस्टी व मौलाना यांचीही बैठक घेऊन बेकायदेशीर भोंगे वाजवू नये, पोलिस व शासन नियमांचे पालन करावे, असे पोलिस उपायुक्त योगेश चव्हाण आवाहन केले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81124 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top