मुलुंडमध्ये सर्वत्र शांतता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुलुंडमध्ये सर्वत्र शांतता
मुलुंडमध्ये सर्वत्र शांतता

मुलुंडमध्ये सर्वत्र शांतता

sakal_logo
By

मुलुंड, ता. ४ (बातमीदार) ः राज्यातील मशिदींवरचे भोंगे ३ मेपर्यंत उतरावे, असा अल्टिमेटम मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिल्यानंतर मुंबई शहरातील अनेक मशिदींनी अजान लाऊडस्पीकरवरून करणे बंद केले आहे. मुलुंडमधील मुलुंड कॉलनी येथील आणि एसीसी रोडस्थित मशीद येथे शांततेचे वातावरण पाहायला मिळाले. पहाटे पाच वाजता होणारी अजान शांततेमध्ये पार पडली. विशेष म्हणजे मुलुंडमध्ये पोलिसांचा चोख बंदोबस्त पाहायला मिळाला. तसेच मुलुंडमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. मुलुंड पोलिसांनी मनसेच्या स्थानिक नेत्यांना नोटीस बजावल्या आहेत. मात्र कोणालाही अद्याप अटक झाली नसल्याची माहिती समोर आली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81128 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top