बेघरांचा रात्र निवारा केंद्र बेघर ...वापरावीना धूळखात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बेघरांचा रात्र निवारा केंद्र बेघर ...वापरावीना धूळखात
बेघरांचा रात्र निवारा केंद्र बेघर ...वापरावीना धूळखात

बेघरांचा रात्र निवारा केंद्र बेघर ...वापरावीना धूळखात

sakal_logo
By

बेघरांचे रात्र निवारा केंद्र बेघर!
तीन वर्षांपासून केंद्र वापराविना धूळखात

तुर्भे, ता. ४ (बातमीदार) : पाच लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असणाऱ्या शहरात रात्र निवारा केंद्र असणे गरजेचे आहे. या संदर्भातील निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले. त्यानुसार नवी मुंबई महापालिकेच्या वतीने घणसोली येथे रात्र निवारा केंद्र उभारण्याचे काम २०१७ मध्ये हाती घेण्यात आले होते. २०१९ मध्ये या केंद्राच्या इमारतीच्या उभारणीचे काम पूर्ण झाले. मात्र, सद्यस्थितीला हे केंद्र वापराविना धूळखात पडून आहे. त्यामुळे शहरातील बेघरांना याचा काहीही उपयोग होत नाही.
जनतेच्या पैशांतून बनलेल्या वास्तूचा वापर होत नाही याबद्दल येथील नागरिकांनी नाराजी व्यक्त केली.

महापालिकेच्या वतीने बेलापूर येथे उड्डाणपुलाच्या खाली रात्रनिवारा केंद्र सुरू करण्यात आले होते. पण हे केंद्र शहराच्या एका बाजूला आहे आणि तिथे योग्य सोयी-सुविधाही नाहीत. त्यामुळे शहरात सुसज्ज अशा रात्र निवारा केंद्रांची गरज प्रकर्षाने जाणवत होती. त्यामुळेच घणसोली सेक्टर ४ येथे हे केंद्र उभारण्यात आले. केंद्रासाठी सरकारकडून १०० टक्के अनुदान दिले जाते. पालिकेने केलेल्या सर्वेक्षणानुसार शहरात बेघरांची संख्या १२७ इतकी होती. आता या संख्येत वाढ झाल्याची दाट शक्यता आहे. हे बेघर रस्त्यावर पदपथांवर बस्तान मांडून राहतात आणि तिथेच आपले दैनंदिन विधी उरकतात. त्यामुळे शहराच्या स्वच्छतेत आणि सौंदर्यातही बाधा निर्माण होते. तरीदेखील या बेघरांची सोय निवारा केंद्रात करण्यात आलेली नाही. याबाबत घणसोली विभाग अधिकारी महेंद्रसिंग ठोके यांच्याशी संपर्क केला. मात्र, त्यांनी अधिक माहितीसाठी मालमत्ता विभागाकडे विचारणा करा, असे सांगितले.

----------
सोयी-सुविधांनी युक्त केंद्र
घणसोली येथील निवारा केंद्रासाठी दोन कोटी ३३ लाख रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. यातून तीन मजल्यांची इमारत उभारण्यात आली. या इमारतीच्या तळमजल्यावर स्वयंपाकघर, कॅण्टीन, दिव्यांगांची खोली, शौचालय, पहिल्या मजल्यावर पुरुषांसाठी हॉल, सर्व्हिस रूम, शौचालय आदी सुविधा देण्यात आल्या आहेत. तिसऱ्या मजल्यावर कुटुंबासाठी चार खोल्या, स्वयंपाकघर, सर्व्हिस रूम आणि स्वच्छतागृह उभारले गेले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81129 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top