
वडाळ्यात शांततापूर्ण वातावरण
वडाळा, ता. ४ (बातमीदार) ः भोंग्यांवरून दोन गटांमध्ये वाद निर्माण होऊन कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने शहरात ठिकठिकाणच्या मशिदींबाहेर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. शिवडी-वडाळा पश्चिम चार रस्ता, रफी अहमद किडवाई मार्ग येथील ‘हरी मशीद’ येथे मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला असून स्थानिक आणि राखीव दलाचे पोलिस तैनात करण्यात आले आहेत. इथे सकाळची अजान भोंग्याविना देण्यात आली. परिसरात शांततापूर्ण वातावरण आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत भोंगा न लावणाऱ्या सर्व मुस्लिम बांधवांचे वडाळा विधानसभा क्षेत्र मनसे विभागप्रमुख आनंद प्रभू यांनी अभिनंदन केले आहे; तर भोंग्यांचा विषय हा धार्मिक नसून सामाजिक आहे. आमचा प्रार्थनेला विरोध नाही, पण भोंग्याला उत्तर भोंग्याने दिले जाणार, असा पवित्रा मनसेने घेतला आहे, असेदेखील प्रभू म्हणाले.
मुंबईकर असोत किंवा महाराष्ट्राची जनता असो, या भोंग्याच्या प्रकरणाशी सर्वसामान्य नागरिकांना काही घेणे-देणे नाही. मुंबई अथवा महाराष्ट्रावर कोणतेही संकट आले तर एकमेकांना साह्य, सेवा, मदत करण्याचे काम मुंबईकर एकजुटीने करतात, असे रजा फाऊंडेशन ट्रस्टचे सचिव मोहम्मद सिद्दिक शेख म्हणाले.
...
वडाळ्यात प्रभाग अध्यक्षास अटक
वडाळा पूर्व येथील बरकत अली दर्गा नाक्यावरील हजरत बरकत अली शहा दर्गा येथे सकाळी ५ वाजता भोंग्यातून अजान झाली. त्यामुळे येथील मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले होते; परंतु पोलिसांचा बंदोबस्त असल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निमार्ण झाला नाही. मात्र मनसे वडाळा विधानसभा प्रभाग क्रमांक १८१ चे अध्यक्ष संजय बन्सी रणदिवे यांना वडाळा पोलिसांनी अटक केली असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
...
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81135 Txt Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..