‘ज्वेल्स’मुळे होल्डिंग पाँडचे महत्व वाढले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘ज्वेल्स’मुळे  होल्डिंग पाँडचे महत्व वाढले
‘ज्वेल्स’मुळे होल्डिंग पाँडचे महत्व वाढले

‘ज्वेल्स’मुळे होल्डिंग पाँडचे महत्व वाढले

sakal_logo
By

बेलापूर, ता. ४ (बातमीदार) ः नवी मुंबई महापालिकेने पाम बीच रोडवरील होल्डिंग पॉंड परिसराचे सुशोभीकरण केल्यामुळे या परिसराचे महत्त्व वाढले आहे. पाम बीच रोडवरील ‘ज्वेल्स ऑफ नवी मुंबई’ येथील ज्वेल्सच्या प्रतिकृतीची समाजकंटकांनी तोडफोड केली होती. यामुळे जवळपास एक वर्ष प्रतिकृती काढण्यात आली होती. सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांनी केलेल्या मागणीवरून महापालिकेने पुन्हा ज्वेल्सची प्रतिकृती बसवली असून तिसऱ्या टप्प्यातील कामांनाही गती दिली आहे.

या परिसराला ‘ज्वेल्स ऑफ नवी मुंबई’ नाव देण्यात आले आहे. होल्डिंग पॉंडच्या कोपऱ्यावर ज्वेल्सची प्रतिकृती तयार केली होती. रात्री विद्युत रोषणाईमुळे पाम बीचवरून जाणाऱ्या नागरिकांचे लक्ष वेधले जात होते. या प्रतिकृतीची तोडफोड झाल्यानंतर तेथे पुन्हा प्रतिकृती बसवावी, अशी मागणी सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी व नागरिकांनी केली होती. मनपा प्रशासनाने या मागणीची दखल घेऊन तेथे नवीन ज्वेल्स बसविला आहे. यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. होल्डिंग पॉंडच्या सभोवती अडीच किलोमीटर लांबीचा जॉगिंग ट्रॅक तयार केला आहे. दुसऱ्या बाजूला स्मृतिउद्यान तयार केले आहे. या परिसरात तिसऱ्या टप्प्यात लहान मुलांना खेळण्यासाठी उपयोगी होईल अशा पद्धतीने कामे केली जात आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81137 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top