मच्छीमार डिझेल पॉलिसीची मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मच्छीमार डिझेल पॉलिसीची मागणी
मच्छीमार डिझेल पॉलिसीची मागणी

मच्छीमार डिझेल पॉलिसीची मागणी

sakal_logo
By

कोपरखैरणे, ता. ४ (बातमीदार) ः मच्छीमारांना मासेमारी करण्याकरिता सवलतीच्या दरात डिझेल मिळणार असले तरी त्यासाठी वेगळी कायमस्वरूपी पॉलिसी करण्यात यावी, अशी मागणी केंद्र सरकारकडे करणार असल्याची माहिती आमदार रमेश पाटील यांनी दिली. जल वाहतूक प्रकल्प सुरू असताना अनेक विकास कामांचा फटका मच्छीमारांना बसतो. यात आता डिझेल सवलत मिळणार असल्यामुळे मच्छीमारांना एक मोठी मदत होणार आहे. डिझेलचे भाव मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे मच्छीमारांना खूप खर्च होत होता. अनेक मच्छीमारांच्या बोटी अनेक महिने किनाऱ्यावर उभ्या होत्या. बोटी बंद असल्याने मच्छीमारांवर उपासमारीची वेळ आली होती. शेजारील गुजरात, कर्नाटक राज्यांतील डिझेल दरातील तफावत सरकारच्या लक्षात आणून दिल्यानंतर सरकारने याबाबत सकरात्मक निर्णय घेतला असे पाटील म्हणाले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81139 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top