
सांडपाण्यावर पिकवलेल्या भाज्यांमुळे आरोग्य धोक्यात
कोपरखैरणे, ता. ४ (बातमीदार) ः नवी मुंबईतील रेल्वे मार्गालगत रासायनिक प्रदूषित सांडपाणी वापरून भाज्या पिकवल्या जातात. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न उपस्थित झाला आहे. ठाणे ते वाशी या ट्रान्स हार्बर मार्गावरील रेल्वे स्टेशन व आजूबाजूला भाज्यांची शेती केली जाते. या भाज्या आरोग्यासाठी अपायकारक आहेत. यांच्यावर त्वरित कारवाई करून ही भाज्यांची शेती बंद झाली पाहिजे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते विनोद पाटील यांनी केली आहे.
ठाणे ते वाशी-बेलापूर या पट्ट्यात अनेक रासायनिक कारखाने आहेत. त्या कारखान्यांतून रसायनयुक्त सांडपाणी नाल्यातून सोडले जाते. या सांडपाण्यावर केलेली शेती बंद करावी म्हणून वेळोवेळी आंदोलने झाली; मात्र परप्रांतीय लोक चोरून मनमानी कारभार करत भाजीपाला शेती करत आहेत. रेल्वे पोलिस याची गांभीर्याने दखल घेत नाहीत. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क केला असता त्यांनी नेहमीप्रमाणे कारवाई करतो ही उत्तरे दिली. त्यामुळे संबंधित विभागाने याप्रकरणी लक्ष देण्याची आवश्यकता आहे, अशी मागणी विनोद पाटील यांनी केली आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81140 Txt Navimumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..