पदपथ मोकळे करण्याची मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पदपथ मोकळे करण्याची मागणी
पदपथ मोकळे करण्याची मागणी

पदपथ मोकळे करण्याची मागणी

sakal_logo
By

कोपरखैरणे, ता. ४ (बातमीदार) ः नवी मुंबई महापालिकेने सुशोभीकरणाबरोबरच फेरीवाले व फूड टेम्पो यांच्याकडे गांभीर्याने लक्ष दिले आहे. त्यामुळे पदपथ मोकळे झाले आहेत. मात्र, हे पदपथ दिवसा मोकळे असतात. पालिकेची पाठ फिरली की फेरीवाले पुन्हा आपले बस्तान मांडतात. त्यामुळे पालिकेने दिखाव्यासाठी कारवाई न करता याबाबत गांभीर्याने कारवाई करावी, अशी मागणी नागरिक करत आहेत.

शहराचे सुशोभीकरण पाहण्यासाठी सरकारी पथक येणार आहे. त्यांना रंगरंगोटीबरोबरच पक्षी दिसले पाहिजेत. मात्र फुटपाथवरील फेरीवाले, फूड ट्रक दिसू नयेत म्हणून पालिकेने त्यांना काही दिवस गायब केले आहे. त्यांना कठोर इशारा देत कारवाईची भीती घातली आहे. पालिकेने फेरीवाल्यांना ही भीती कायमस्वरूपी घातली तर पदपथांवर चालताना आनंदाने चालता येईल, असे नागरिक म्हणत आहेत. शहराचा क्रमांक पहिला येत असेल तर आम्हाला आनंदच आहे. मात्र, आमच्या पोटापाण्याचे काय? असा सवाल फूड टेम्पो चालक सचिन भोसले यांनी केला आहे. ही कारवाई कायमस्वरूपी आहे. फूड टेम्पो व फेरीवाले यांना दुसरीकडे जागा बघण्यासाठी सांगितले आहे, असे घणसोली विभागीय अधिकारी महेंद्र सिंह ठोके यांनी सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81141 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top