पालिका अधिकाऱ्याकडून मानवतेची कृती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पालिका अधिकाऱ्याकडून मानवतेची कृती
पालिका अधिकाऱ्याकडून मानवतेची कृती

पालिका अधिकाऱ्याकडून मानवतेची कृती

sakal_logo
By

बेवारस इसमाला जीवनदान
तुर्भे, ता. ४ (बातमीदार) : घणसोली सेक्टर ९ येथील रस्त्याच्या दुभाजकावर एक बेवारस व्यक्ती बेशुद्ध पडली होती. घणसोली विभाग कार्यालयाचे अभियंता रोहित ठाकरे यांच्या ही गोष्ट निदर्शनास आली. तेव्हा त्यांनी बेशुद्ध पडलेल्या व्यक्तीला रुग्णलयात दाखल केले. या कृतीमुळे ठाकरे यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

घणसोली सेक्टर ९ येथील रस्त्याच्या दुभाजकावर एक ५५ वर्षीय बेवारस व्यक्ती निपचित पडली होती. अगदी त्याच वेळेस काही कामानिमित्त घणसोली विभाग कार्यालयाचे अभियंता रोहित ठाकरे व अधीक्षक संतोष सिलाम पेट्रोलिंग करत होते. त्या वेळी त्यांना ही व्यक्ती निपचित पडल्याचे लक्षात आले. त्यांनी त्या व्यक्तीच्या तोंडावर पाणी मारून शुद्धीवर आणले. त्यानंतर त्याला पाणी व ज्यूस प्यायला दिले. त्याची प्रकृती नाजूक आहे हे लक्षात आल्यावर ठाकरे यांनी संदर्भ रुग्णालयात दूरध्वनी करून रुग्णवाहिका मागवली. मग त्या व्यक्तीला रुग्णवाहिकेत बसवून मनपा रुग्णालयात पाठवण्यात आले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81143 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top