
मानखुर्दमधील मनसे पदाधिकारी भूमिगत
मानखुर्द, ता. ४ (बातमीदार) ः भोंग्यांविरोधातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या भूमिकेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी पदाधिकाऱ्यांना नोटिसा बजावल्या आहेत. पोलिसांचा सासेमिरा चुकवण्यासाठी तसेच पक्षाध्यक्ष राज ठाकरे किंवा वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना अटक झाली तर आंदोलन तीव्र करण्यासाठी मानखुर्द शिवाजीनगर विधानसभेतील पदाधिकारी भूमिगत झाले आहेत.
भोंग्यांच्या प्रकरणावरून पोलिस मनसे कार्यकर्त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवून आहेत. पोलिस ठाण्यात बोलावून किंवा घरी जाऊन चौकशी करत आहेत. या ससेमिऱ्याला वैतागून मनसेचे पदाधिकारी भूमिगत झाले आहेत. याविषयी बोलताना महाराष्ट्र चर्मोद्योग कामगार सेनेचे अध्यक्ष सतीश वैद्य म्हणाले, त्यांना शिवाजीनगर पोलिसांनी बोलावून नोटीस दिली. या परिसरात आंदोलनाची गरज पडणार नाही. त्यामुळे कायदा-सुव्यवस्था भंग होईल, असे काहीही मनसेकडून होणार नसल्याचे आश्वासन दिले होते. तरीदेखील देवनार पोलिसांकडून नोटीस आली. पोलिस हालचालींवर लक्ष ठेवून आहेत. पोलिसांच्या या वागण्यामुळे वैतागून एखादा खरेच आंदोलन करून कायदा सुव्यवस्था धोक्यात आणेल. याच त्रासाला कंटाळून ते भूमिगत झाले आहेत.
प्रभाग १४१ चे शाखा अध्यक्ष सचिन ससाणे यांनी सांगितले, की भोंग्याच्या बाबतीत स्थानिक मुस्लिम बांधव सहकार्य करत असून त्यांनी भोंग्यांचा वापर टाळण्यास तसेच कमी आवाजात भोंगे वापरण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे आंदोलन करण्याची गरज नाही, तरीदेखील पोलिसांचा ससेमिरा मागे लागला आहे.
...
महाराष्ट्र सैनिक आक्रमक होतील!
सरकारला खरोखरच शांतता राखायची असती तर त्यांनी योगी सरकारप्रमाणे भूमिका घेतली असती, तसेच राज्य सरकारने जर राज ठाकरे यांना अटक करायचा प्रयत्न केला, तर महाराष्ट्र सैनिक आक्रमक होतील, असे मानखुर्द-शिवाजी नगर विधानसभा क्षेत्राचे मनसे विभाग अध्यक्ष जगदीश खांडेकर यांनी सांगितले.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81144 Txt Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..