रौप्य महोत्सवी वर्षातील बालनाट्य शिबीराचा समारोप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रौप्य महोत्सवी वर्षातील बालनाट्य शिबीराचा समारोप
रौप्य महोत्सवी वर्षातील बालनाट्य शिबीराचा समारोप

रौप्य महोत्सवी वर्षातील बालनाट्य शिबीराचा समारोप

sakal_logo
By

वाशी, ता. ४ (बातमीदार) ः संत शिरोमणी कला मंच- नवी मुंबई आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा, नवी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने १९ एप्रिल ते ३० एप्रिल यादरम्यान बालनाट्य शिबिराचे आयोजन संस्थेचे अध्यक्ष श्रीहरी पवळे यांनी केले होते. या शिबिरात ४० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या बालनाट्य शिबिराचा समारोप १ मे महाराष्ट्र दिनी विष्णुदास भावे नाट्यगृह येथे करण्यात आला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून लेखक मुकुंद महाले, मोहन भोईर, पत्रकार अनिलकुमार उबाळे, पालक प्रतिनिधी अर्चना खरात व विद्यार्थी प्रतिनिधी केदार सुपारकर उपस्थित होते. या वेळी शिबिरार्थींना पाहुण्यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81145 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top