दहिसमध्ये बेसबॉल खेळ रंगणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दहिसमध्ये बेसबॉल खेळ रंगणार
दहिसमध्ये बेसबॉल खेळ रंगणार

दहिसमध्ये बेसबॉल खेळ रंगणार

sakal_logo
By

मुंबई, ता. ४ : एकदिवसीय मल्हार बेसबॉल लीगचा थरार शनिवारी (ता. ७) अनुभवायला मिळणार आहे. चार संघांचा समावेश असलेली ही स्पर्धा दहिसर येथील गावठाण मैदानावर पार पडेल. मुंबई उपनगर बेसबॉल संघटनेच्या मान्यतेने होत असलेल्या या स्पर्धेचे यंदाचे दुसरे वर्ष असून ही स्पर्धा कोरोना महामारीमुळे दोन वर्षे आयोजित होऊ शकली नव्हती. याआधी मे २०१९ मध्ये या स्पर्धेचे पहिले सत्र पार पडले होते. त्यामुळे मुंबईतील बेसबॉलपटूंमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. पिंक पँथर, ब्लॅक डेविल्स, सनरायझर्स आणि ब्ल्यू इंडियन्स अशा चार संघांचा समावेश असलेल्या या स्पर्धेत राष्ट्रीय व राज्य स्तरावर चमकलेल्या खेळाडूंनी सहभाग घेतला आहे. ‘दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर ही लीग रंगणार असल्याने खेळाडूंमध्ये उत्साह आहे,'' असे स्पर्धा आयोजक दुर्वांक म्हात्रे यांनी सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81148 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top