
मधुमेहामुळे गमावला एक पाय
मुंबई, ता. ५ : मधुमेहामुळे एक पाय गमावलेल्या व्यक्तीचा दुसरा पाय वाचवण्यात डॉक्टरांना यश आले आहे. मुलुंड येथील एका खासगी रुग्णालयाच्या डॉक्टरांनी या व्यक्तीवर यशस्वी उपचार केले आहेत.
मधुमेही रुग्णांमध्ये पायाच्या समस्या, तसेच पाय आणि पावलांमध्ये मधुमेहासंदर्भातील संसर्ग होण्याची शक्यता असते. पायाला होणाऱ्या या प्रकारच्या दुखापतींमुळे अल्सर आणि संसर्ग होऊ शकतो. अधिक गंभीर त्रासांमध्ये पाय कापावा लागतो. रक्तवाहिन्यांना इजा झाल्यासही तुमच्या पायाला रक्त आणि ऑक्सिजनचा पुरेसा पुरवठा होत नाही. भारतात दरवर्षी एक लाख नागरिक मधुमेहामुळे पाय गमावतात, तर अनेक नागरिक काही वर्षांनी आपला दुसरा पाय गमावतात.
प्लॅटिनम रुग्णालयाचे एंडोव्हस्कुलर शल्य चिकित्सक व तज्ज्ञ डॉ. विनीत पालीवाल यांनी सांगितले की, डायबेटिक फूटच्या त्रासामुळे २०१३ साली मिलिंद मोने (वय ५७) यांचा पाय गुडघ्याखाली कापावा लागला होता, तसेच २०१४ साली उजव्या पायाची बोटे कापण्यात आली होती. मधुमेह, उच्च रक्तदाब असल्यामुळे त्यांचे हृदय कमजोर झाले होते. अशा स्थितीत जर त्यांचा उजवा पाय कापावा लागला असता तर त्यांना कायमचे अपंगत्व आले असते. गेल्या महिन्यात ते उपचारासाठी आले तेव्हा त्यांच्या उजव्या पायाला अल्सर झाला होता. रक्तवाहिन्यांना इजा झाल्यामुळे पायाला रक्त आणि ऑक्सिजनचा पुरेसा पुरवठा होत नाही. अशा परिस्थितीत पाय कापणे हाच पर्याय होता, पण आम्ही त्यांचा पाय वाचवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला.
...
एंडोव्हॅस्क्युलर सर्जरीचा फायदा
सिटी स्कॅन केल्यावर रुग्णाच्या पायात ब्लॉकेज दिसून आले. तातडीने एंडोव्हॅस्क्युलर सर्जरी करून पोटातील रक्तवाहिन्यांतील ब्लॉकेज पायाची अँजिओप्लास्टी करून उघडण्यात आला आणि मांडीतल्या रक्तवाहिनीतील ब्लॉकेज बायपास करून उघडण्यात आला. त्यामुळे त्यांच्या पायातील रक्तपुरवठा सुरळीत झाला. जखम भरण्यास मदत झाली आणि त्यांचा पाय वाचवण्यात यश आले. रक्तवाहिन्यांच्या आजारांमध्ये (पेरिफेरल आर्टरी डिसीज) ही सर्जरी लाभदायक ठरते.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81149 Txt Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..