नवनीत राणा जे. जे. रुग्णालयात दाखल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Navneet Rana Hospitalized
नवनीत राणा जे. जे. रुग्णालयात दाखल

नवनीत राणा जे. जे. रुग्णालयात दाखल

मुंबई : ‘मातोश्री’बाहेर हनुमान चालिसा पठणाचा इशारा देऊन कायदा व सुव्यवस्था बिघडवल्याच्या आरोपाखाली तुरुंगात असलेल्या राणा दाम्पत्याला आज जामीन मंजूर झाला; मात्र नवनीत राणा यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या मानेच्या दुखण्यावर उपचार सुरू आहेत.

नवनीत राणा यांना पोलिसांनी जे. जे. रुग्णालयात १.३० वाजता दाखल केले. त्यांना ऑर्थोपेडिक्स विभागात ठेवण्यात आले आहे. त्यांच्या अहवालांचे निरीक्षण करून मूल्यमापन केले जात असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली.

नवनीत आणि रवी राणा यांना मुंबई पोलिसांनी प्रक्षोभक वक्तव्य केल्याप्रकरणी २३ एप्रिलला त्यांच्या खार येथील निवासस्थानातून अटक केली होती. मुंबई सत्र न्यायालयात हजर केल्यानंतर राणा दाम्पत्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. न्यायालयाने अटी-शर्तींसह त्यांना आज जामीन मंजूर केला आहे. पोलिसांना याप्रकरणी आरोपींची चौकशी करायची असेल तर २४ तासांची आगाऊ नोटीस द्यावी, असेही न्यायाधीशांनी आदेशात स्पष्ट केले आहे.

नवनीत राणा यांना स्पॉण्डिलायटिस असून त्यांच्या जीवाला काही झाले तर तुरुंग अधिकारी जबाबदार असतील, असे पत्र त्यांच्या वकिलांनी भायखळा तुरुंग अधीक्षकांना लिहिले होते. त्यानंतर बुधवारी नवनीत राणा यांची प्रकृती खालावली असून त्यांना जे. जे. रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81151 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top