
संदीप देशपांडे यांचा पोलिसांना चकवा
प्रभादेवी, ता. ४ (बातमीदार) : राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर अनेक मनसे कार्यकर्त्यांचे फोन बंद होते. बुधवारी शिवाजी पार्क येथील राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानाबाहेर माध्यमांना प्रतिक्रिया देताना मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांना पोलिसांनी ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला; मात्र पोलिसांना चकवा देत ते गाडीत बसून तिथून निघून जाण्यात यशस्वी झाले.
मशिदींवरील भोंग्यांसंदर्भातील माहिती देण्याकरिता संदीप देशपांडे व संतोष धुरी हे राज ठाकरे यांच्या निवासस्थानी गेले होते. माध्यमांशी प्रतिक्रिया देत असताना पोलिसांनी त्यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. ते निघून जात असताना महिला पोलिसांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला; मात्र माध्यम प्रतिनिधींच्या गर्दीचा फायदा घेत ते गाडीत बसून निघून गेले. मात्र त्या वेळी महिला पोलिस जमिनीवर कोसळली.
दरम्यान, शिवतीर्थ या निवासस्थानाबाहेर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त होता. मशिदींवरील भोंगे उतरवले नाहीत तर आम्ही सह्यांची मोहीम राबवून हे आंदोलन सुरू ठेवणार असल्याचे मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81154 Txt Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..