ठाणे जिल्ह्यात 'पाणी' टंचाईच्या झळा तीव्र... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

२६ टँकरद्वारे पाणीपुरवठा
ठाणे जिल्ह्यात टंचाईच्या झळा तीव्र

ठाणे जिल्ह्यात 'पाणी' टंचाईच्या झळा तीव्र...

ठाणे : ठाणे जिल्ह्यात जलजीवन मिशन अंतर्गत विविध योजना राबवूनदेखील पाणीटंचाईचे संकट दिवसेंदिवस अधिक गडद होत असल्याचे चित्र आहे. शहापूर तालुक्यातील ९४ गावपाड्यांसह, मुरबाड तालुक्यातील २३ गावपाड्यांवर पाणीटंचाईच्या झळा लागल्या आहेत. त्यामुळे या ठिकाणी २६ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. मे महिन्याच्या सुरुवातीपर्यंतच ही स्थिती असल्याने जून महिन्याच्या पंधरवड्यापर्यंत टंचाईच्या झळा आणखी गडद होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

ठाणे जिल्हा हा धरणांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. त्यातील शहापूर आणि मुरबाड तालुक्यात भातसा, तानसा, वैतरणा आणि बारवी अशी मोठी धरणे या तालुक्यात आहेत; परंतु पाणी पिकवणाऱ्या तालुक्यांमधील अनेक गावपाड्यांवर सध्या पाणीटंचाईच्या झळा बसण्यास सुरुवात झाली आहे. शहापूर, मुरबाड, अंबरनाथ, भिवंडी आणि कल्याण तालुक्यातील ग्रामीण भागात साधारणत: फेब्रुवारी व मार्च महिन्याच्या पहिल्या अथवा दुसऱ्या आठवड्यात पाणीटंचाई जाणवते. परिणामी या भागात टँकरने पाणीपुरवठा केला जातो.

मागील वर्षी जिल्ह्यातील शहरी भागासह ग्रामीण भागातदेखील पावसाने दमदार हजेरी लावली. अपेक्षेपेक्षा अधिक पाऊस होऊनही टंचाईच्या झळा बसण्यास सुरुवात झाली आहे. मुरबाड तालुक्यातील १० गावे आणि १३ पाड्यांवर ६ टँकरने; तर शहापूर तालुक्यातील १० गाव आणि ८४ पाड्यांवर २० टँकरने पाणीपुरवठा होत आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81156 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top