दिव्यांग मुलाच्या मातेला मारहाण प्रकरणी आठ जणांवर गुन्हे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दिव्यांग मुलाच्या मातेला मारहाण प्रकरणी आठ जणांवर गुन्हे
दिव्यांग मुलाच्या मातेला मारहाण प्रकरणी आठ जणांवर गुन्हे

दिव्यांग मुलाच्या मातेला मारहाण प्रकरणी आठ जणांवर गुन्हे

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ४ : गतिमंद मुलाचा दिव्यांग दाखला काढण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात गेलेल्या महिलेला मारहाण करून विनयभंग केल्याचा आरोप असलेल्या आठ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. न्यायालयाने फटकारल्यानंतर पोलिसांनी दोन वर्षांनंतर ही कारवाई केली असून या आठही आरोपींना अटक होण्याची शक्यता आहे. यामध्ये रुग्णालयातील सहा सुरक्षा रक्षक, एक वैद्यकीय अधिकारी यांच्यावर तसेच या गुन्ह्याचे चित्रीकरण नष्ट करून गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करणाऱ्या पोलिस उपनिरीक्षकाचा समावेश आहे.
मुंब्रा येथे राहणाऱ्या शबनम रैन यांचा मोहम्मद नावेद (वय ११) हा मुलगा गतिमंद आहे. ४ नोव्हेंबर २०२० रोजी शबनम रैन या मुलाला घेऊन छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखला घेण्यासाठी गेल्या होत्या. त्या वेळी कर्तव्यावर असलेले वैद्यकीय अधिकारी अशोक गढरी यांनी शबनम रैन यांना अर्वाच्य भाषेत शिविगाळ केली. या प्रकाराचे शबनम रैन यांनी चित्रीकरण करण्याचा प्रयत्न केला असता, डॉ. गढरी यांच्या सांगण्यावरून उपस्थित असलेले सुरक्षा रक्षक नरेंद्र पगारे, सुप्रिया नाईक, अश्विनी यादव, राहुल जाधव, गणेश पाटील, अमूल कराळे यांनी शबनम रैन यांना मारहाण केली.
यासंदर्भात शबनम रैन यांनी कळवा पोलिस ठाणे गाठून तक्रार नोंदवण्याचा प्रयत्न केला असता, तेथे उपस्थित असलेले पोलिस उपनिरीक्षक गिरीश यादव यांनी मोबाईलमधील चित्रीकरण नष्ट केले. त्यानंतर शबनम रैन यांनी सीसी टीव्ही फुटेज मिळवले. त्यामध्येही रैन यांना मारहाण झाली असल्याचे स्पष्ट दिसत होते. यासंदर्भात रैन यांनी मुलासह उपोषणाचा मार्गही अनुसरला होता; मात्र त्यावर कारवाई न झाल्याने अखिल भारतीय दिव्यांग सेनेचे नेते मोहम्मद युसूफ खान यांनी याप्रकरणी पाठपुरावा केला. याप्रकरणी न्यायालयात याचिका दाखल केली. याचिकेवर सुनावणी देताना न्यायालयाने सर्व आरोपींविरोधात गुन्हा दाखल करून कार्यवाही करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81164 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top