मनसे जिल्हाध्यक्षांसह पदाधिकारी प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून ताब्यात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मनसे जिल्हाधिकाऱ्यासह पदाधिकारी ताब्यात
मनसे जिल्हाधिकाऱ्यासह पदाधिकारी ताब्यात मनसे जिल्हाध्यक्षांसह पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

मनसे जिल्हाध्यक्षांसह पदाधिकारी प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून ताब्यात

उरण : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांना विरोध म्हणून हनुमान चालिसा लावण्याचा इशारा दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यात पोलिस प्रशासनाने कडक बंदोबस्त ठेवला आहे. उरण तालुक्यातही कायदा व सुव्यवस्था बिघडू नये म्हणून मशिदींबाहेर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. उरण पोलिसांनी मनसेच्या रायगड जिल्हाध्यक्षांसह पदाधिकाऱ्यांना प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून ताब्यात घेतले आहे.

मनसे रायगड जिल्हा अध्यक्ष संदेश ठाकूर, महाराष्ट्र प्रदेश चिटणीस मनसे वाहतूक सेना अल्पेश कडू, उरण तालुका उपाध्यक्ष मंगेश वाजेकर, उरण तालुका संघटक सतीश पाटील, रायगड उपजिल्हा संघटक रितेश पाटील यांना वाणीआळी येथील मनसे कार्यालयातून ताब्यात घेण्यात आले; अशी माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील पाटील यांनी दिली.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81165 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top