
उल्हासनगरात प्रेमिकेला फिरवण्यासाठी मोटरसायकलींची चोरी
उल्हासनगर, ता. ४ (वार्ताहर) : प्रेमिकेला फिरवण्यासाठी मोटरसायकलींची चोरी करणाऱ्या एका २० वर्षीय तरुणाला विठ्ठलवाडी पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून त्याच्याकडून तीन गाड्या ताब्यात घेण्यात आल्या आहेत.
दिनेश खैरे हे बिल्डर संजय वासवानी यांच्याकडे सुपरवायझरचे काम करतात. वासवानी यांनी खैरे यांना कामकाजासाठी मोटरसायकल वापरण्यास दिली होती. खैरे हे जुन्या महाराष्ट्र बँकेजवळील हंसधाम सोसायटीत राहत असून त्यांनी ३० एप्रिल रोजी रात्री १० वाजता पार्किंगमध्ये मोटरसायकल उभी केली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी ८.३० वाजण्याच्या सुमारास खैरे पार्किंगमध्ये गेले असता मोटरसायकल गायब होती. त्यांनी याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.
पोलिसांनी पार्किंगमधील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले असता एक तरुण मोटरसायकल काढत असल्याचे उघड झाले. त्यानुसार पोलिसांनी मागोवा घेतला असता रेल्वे स्टेशनजवळील सप्तशृंगी अपार्टमेंट सोसायटीमधील वॉचमनचा मुलगा हर्ष थापा याने ही मोटरसायकल चोरल्याचे निष्पन्न झाल्यावर त्याला अटक करण्यात आली. त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता प्रेमिकेला फिरवण्यासाठी तीन मोटरसायकली चोरी केल्याची कबुली त्याने दिली आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81166 Txt Thane
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..