ठाण्यात मनसे आंदोलनाचा फुसका ''भोंगा'' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ठाण्यात मनसे आंदोलनाचा फुसका ''भोंगा''
ठाण्यात मनसे आंदोलनाचा फुसका ''भोंगा''

ठाण्यात मनसे आंदोलनाचा फुसका ''भोंगा''

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ४ : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंगे उतरवण्यासाठी ३ मे चा अल्टिमेटम दिला होता. त्यानंतर मशिदीवरील भोंगे न उतरवल्यास आणि अनधिकृतपणे सकाळची बांग सुरू झाली तर मनसेच्या वतीने हनुमान चालिसा वाजवण्याचा निर्धार केला होता. त्यानुसार मंगळवारी रात्रीपासूनच ठाणे पोलिस आयुक्तालयातील महत्त्वाच्या मशिदींच्या बाहेर कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता; तर दुसरीकडे ठाणे-मुंब्रा भागातील अनेक मशिदींमध्ये बुधवारी पहाटेची अजान भोंग्याविना झाली.
अजानच्या वेळी न्यायालयाने दिलेल्या सूचनेचे पालन करीत नमाज पठण करण्यात आले. त्यामुळे ठाण्यात मनसेच्या भोंग्यांचा बार फुसका निघाला असल्याचे दिसून आले; तर वागळे इस्टेट भागातील इंदिरा नगर भागात मनसेच्या पदाधिकाऱ्याने पहाटेच्या सुमारास मशिदीसमोर हनुमान चालिसा लावली असता पोलिसांनी वेळीच त्याला ताब्यात घेतले. या सर्व घडामोडींच्‍या पार्श्वभूमीवर मनसेचे प्रमुख नेते मात्र भूमिगत झाले असल्याचे चित्र पाहावयास मिळाले.
मशिदींबाहेर पोलिसांकडून भोंग्यांच्या आवाजाची क्षमता मोजली जात होती. भोंगा उतरवला नाही तर मुंब्रा येथील मशिदीबाहेर संघर्ष करणार, असे आव्हान अविनाश जाधव यांनी दिल्याने ठाण्यात भोंग्यांचा संघर्ष तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जात होती. त्यानुसार ठाणे पोलिसांनीदेखील याची गांभीर्याने दखल घेत ठाणे पोलिस आयुक्तालय क्षेत्रातील महत्त्वाच्या व संवेदनशील अशा परिसरातील मशिदींच्या बाहेर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात केला होता.

कोट :-
मशिदींच्या ठिकाणी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार मशिदीतदेखील सकाळची अजान ही भोंग्याविना झाली; तर येथील आवाजाची क्षमता मोजण्यासाठी यंत्रेदेखील ठेवण्यात आली असल्याची माहिती दिली.
संतोष घाटेकर, राबोडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक
….

कोट :-
सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या सूचनेनुसार आम्ही पहाटेची अजान भोंग्याविना घेतली. त्यानंतर आम्ही नियमांचे पालन करीत दुपारची अजानदेखील कमी आवाजात पठण केली.
- अब्दुल सल्मान बांगी, उपाध्यक्ष, राबोडी मशीद ट्रस्ट
….
३०० हून अधिक मनसे पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात
कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उद्‍भवू नये याकरिता ठाणे पोलिस आयुक्तालयांतर्गत पोलिसांनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांना नोटिसा बजावत अनेक पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेण्यास सुरुवात केली. त्यानुसार सुमारे ३०० हून अधिक मनसे कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81168 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top