पतीसाठी महिलेकडून मूत्रपिंड दान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पतीसाठी महिलेकडून मूत्रपिंड दान
पतीसाठी महिलेकडून मूत्रपिंड दान

पतीसाठी महिलेकडून मूत्रपिंड दान

sakal_logo
By

तुर्भे, ता. ९ (बातमीदार) : वाशी येथील डॉक्‍टरांनी ६७ वर्षीय व्यक्तीवर मूत्रपिंडांचे यशस्वीरीत्या प्रत्‍यारोपण केले. यासाठी त्या व्यक्तीच्या ६२ वर्षीय पत्नीने स्वत:च मूत्रपिंड दान केले असून वयाच्या साठीनंतर रुग्‍णांवर प्रत्‍यारोपण करणे आव्‍हानात्‍मक असते, असे डॉक्टरांनी सांगितले.

बहुतांश प्रत्‍यारोपण प्रकरणे तरुण, मध्‍यम वयोगटातील व्‍यक्‍तींमध्‍ये आढळून आली आहेत, ज्‍यांना इतर कोणतेही आरोग्‍यविषयक आजार नसतात. मात्र ६० वर्षांवरील व्‍यक्‍तींच्या मूत्रपिंड प्रत्यारोपणाचे प्रमाण १० टक्क्यांपेक्षा कमी आहे. या रुग्णाला वयोमानानुसार हृदयविषयक काही आजार आहेत. तसेच त्यांची कोविड महामारीदरम्‍यान ॲंजिओप्‍लास्‍टी झाली होती आणि यंदा जानेवारीमध्‍ये कोरोनादेखील झाला होता. तर त्‍याच्‍या पत्‍नीचीदेखील नऊ महिन्‍यांपूर्वी ॲंजिओप्‍लास्‍टी झाली होती. रुग्‍णाला शस्त्रक्रियेनंतर डायलिसिसची गरज भासणार नाही, असे डॉक्टरांनी सांगितले. पण जोडप्‍याच्‍या एकमेकांवरील विश्‍वासाने पत्‍नीला तिचे मूत्रपिंड दान करण्‍यास डॉक्टरांनी प्रोत्‍साहित केले आणि वाशी येथील खाजगी रुग्णालयामधील डॉ. अतुल इंगळे यांनी त्‍यांच्‍या पथकासह यशस्‍वी प्रत्‍यारोपण केले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81169 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top