मुंबईतील मुस्लीम भागात शांतता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबईतील मुस्लीम भागात शांतता
मुंबईतील मुस्लीम भागात शांतता

मुंबईतील मुस्लीम भागात शांतता

sakal_logo
By

मुंबादेवी, ता. ४ (बातमीदार) : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांविरोधात दिलेल्या इशाऱ्यानंतर मुंबईत आज सकाळपासूनच सर्वत्र भयाण शांतता पसरली होती. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनीही सर्व मशिदींबाहेर तगडा बंदोबस्त ठेवला होता. पोलिसांनी मंगळवारी रात्रीच मनसे कार्यकर्त्यांना १४९ च्या नोटिसा बजावल्यानंतर कार्यकर्ते रात्रीनंतर ‘नॉट रिचेबल’ झाले होते.
शहरातील भायखळा, नागपाडा, जे. जे. मार्ग, डोंगरी, पायधुनी या दक्षिण मुंबईतील अत्यंत संवेदनशील मुस्लिमबहुल परिसरात पोलिसांच्या कडक बंदोबस्तामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. डोंगरी नुरबाग येथील सुन्नी मशीद, मसजिद ओ मदरसा, उम्र फारुख, पठाणवाडी मशीद, मोगल मशीद, फारुख मशीद, मशीद ए दकानी, शाफी मशीद, पीर बडेमिया दर्गा आदी परिसरात पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात ठेवला होता. डोंगरी पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षक शबाना शेख यांनी विभागात प्रभात फेरी काढून नागरिकांना शांततेचे आवाहन केले होते.
---------

विभागातील महत्त्वाच्या ठिकाणी आणि मशीद परिसरात चोख बंदोबस्त ठेवला होता. लाऊडस्पीकरवर अजानदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून काळजी घेत आहोत. अनेक ठिकाणी अजानच्या आवाजाची तीव्रता ५५ डेसिबलपेक्षा कमी होती. विभागात शांतता असून कायदा व सुव्यवस्था राखली जात आहे.
- शबाना शेख, वरिष्ठ निरीक्षक, डोंगरी पोलिस ठाणे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81173 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top