
आरपीआयने दिले मशिदींना संरक्षण
नवी मुंबई, ता. ४ (बातमीदार) : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांविरोधात भूमिका घेतल्याने संपूर्ण राज्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर नवी मुंबईतील रिपब्लिकन पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी तुर्भे स्टोर येथील तीन माशिदींना संरक्षण दिले. तसेच मिठाई व गुलाबपुष्प वाटप करून सर्वधर्मसमभावाचा संदेश दिला.
या वेळी रिपाईंच्या कार्यकर्त्यांकडून मुस्लिम समाज के सन्मान मे आरपीआय मैदान में, हम सब एक है, हिंदू-मुस्लिम भाई-भाई अशा घोषणा देण्यात आल्या. या वेळी रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष सिद्राम ओहोळ यांनी धार्मिक-जातीय तेढ निर्माण करणाऱ्याला रिपब्लिकन पक्ष जशास तसे उत्तर देईल, असा इशारा दिला. या वेळी मुस्लिम समाजाचे नेते आलम बाबा, बाळासाहेब मिरजे, ज्येष्ठ उपाध्यक्ष नागेश कांबळे, युवा नेते यशपाल ओहोळ, शिलाताई बोदडे, रमेश बोदडे, आयुब खान, इमरान शेख, अभिमान जगताप, विनोद वानखेडे, संजू कांबळे, फयाज शेख, मंगेश शिंदे, सिद्धार्थ शिरसाट, राहुल साबळे, विनोद दुपरगावडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81175 Txt Navimumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..