राणा दाम्पत्याच्या घराची आज पालिकेकडून पाहणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राणा दाम्पत्याच्या घराची आज पालिकेकडून पाहणी
राणा दाम्पत्याच्या घराची आज पालिकेकडून पाहणी

राणा दाम्पत्याच्या घराची आज पालिकेकडून पाहणी

sakal_logo
By

मुंबई, ता. ४ ः राणा दाम्पत्याच्या खार येथील निवासस्थानी पाहणी करण्यासाठी जाण्याच्या तयारीत असलेल्या मुंबई पालिकेच्या पथकाला आपला दौरा रद्द करावा लागला. राणा दाम्पत्याच्या घराला कुलूप असल्याने पालिकेचे पथक आज पाहणी करण्यासाठी गेले नाही. आता गुरुवारी (ता. ५) राणा यांच्या घराची पाहणी होणार आहे.

राणा यांच्या घरात काही अनियमितता असल्याचा संशय महापालिकेच्या अधिकाऱ्यांना होता. त्यासाठीच खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना पालिकेने पाहणीसाठी नोटीस बजावली होती, पण राणा दम्पत्य न्यायालयीन कोठडीत असल्याने महापालिकेने आजचा दौरा पुढे ढकलला. गुरुवारी त्यांच्या घरी पडताळणीसाठी जाणार असल्याचे एच पश्चिम विभागाचे सहायक आयुक्त विनायक विसपुते यांनी स्पष्ट केले. राणा दम्पत्य खार पश्चिमेतील लॅव्ही अपार्टमेंटमध्ये १४ व्या मजल्यावर वास्तव्यास आहे. आमदार रवी राणा यांच्या मालकीचे हे घर आहे. मुंबई महापालिकेने एमएमसी कायद्यान्वये अनुच्छेद ४८८ अन्वये राणा दम्पत्याला नोटीस पाठवली होती. मंजूर आराखड्यापेक्षा प्रत्यक्ष फेरफार आढळला तर कारवाई करण्याचीही महापालिकेने तयारी केली आहे. गरज पडल्यास अनधिकृत बांधकाम तोडण्यात येईल, असेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81190 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top