‘आयफ्लोज’ ॲपद्वारे मॉन्सूनचा ठावठिकाणा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

weather update of Monsoon through iFlows app
‘आयफ्लोज’ ॲपद्वारे मॉन्सूनचा ठावठिकाणा

‘आयफ्लोज’ ॲपद्वारे मॉन्सूनचा ठावठिकाणा

मुंबई : दरवर्षी पावसाळ्यात मुंबईची ‘तुंबई’ झाल्यानंतर नागरिकांचा होणारा खोळंबा नवीन नाही. पावसाळ्यात ठिकठिकाणी पाणी तुंबल्यामुळे नागरिकांची कोंडी होते आणि पुढील वेळापत्रक पुरते कोलमडते. याच पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाने ॲप विकसित केले आहे. या ॲपद्वारे मान्सूनची सद्यस्थिती, विविध ठिकाणी होणारे पर्जन्यमान, आपत्कालीन इशारा, मुंबईतील हवामानाची स्थिती आदी माहिती या ॲपच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे.

येत्या पंधरवड्यात हे अॅप मुंबईकरांना वापरासाठी मिळेल. ‘आयफ्लोज’ (आयएफएलओडब्ल्यूएस) असे या ॲपचे नाव असून, त्याद्वारे नागरिकांना अद्ययावत स्वरूपातील माहिती उपलब्ध होणार आहे. मोबाईल ॲपच्या माध्यमातून माहितीचे विकेंद्रीकरण करणे अपेक्षित आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने मान्सून अलर्ट देणारे ॲप विकसित केले आहे. आधीच्या तुलनेत या नव्या ॲपमध्ये जास्त वैशिष्ट्यांचा समावेश आहे. तसेच मुंबईतील अधिक रेनगेज स्टेशनच्या माध्यमातून नागरिकांना अद्ययावत माहिती पोहोचवणे, हे या ॲपचे उद्दिष्ट आहे. मुंबईकरांना अतिवृष्टी, भरतीच्या वेळा, तसेच पर्जन्यमान याबाबतचे अपडेटही या ॲपमधून मिळणार आहेत. तसेच ट्विटर, इन्स्टाग्राम, चॕटबोटच्या माध्यमातूनही ही माहिती उपलब्ध होणार आहे.

आयफ्लोज हे नवीन ॲप २० मे रोजी मुंबईकरांच्या सेवेत येईल. सध्या पालिकेने प्रत्येक चार किलोमीटरच्या अंतरावर रेनगेज उभारले आहेत. रेनगेज सिस्टिमच्या माध्यमातून मुंबई शहर, उपनगरातील माहिती ॲपवर उपलब्ध होणार आहे.
- महेश नार्वेकर, आपत्कालीन व्यवस्थापन विभाग प्रमुख.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81191 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top