
अश्लील वर्तन करणारा सराईत गुन्हेगार अटक
नालासोपारा, ता. ४ (बातमीदार) : छोट्या पडद्यावरील व्हिडीओ पार्लरमध्ये अश्लील सिनेमे पाहून अल्पवयीन मुली, महिला यांना पाहताच अश्लील वर्तन, गर्दी किंवा सार्वजनिक ठिकाणी त्यांना इशारा करून महिला, मुलींच्या मनात लज्जा निर्माण होईल असे कृत्य करणाऱ्या एका नराधमाला नालासोपारा येथून पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. नऊ वर्षांच्या अल्पवयीन मुलीसोबत गैरकृत्य केल्याच्या प्रकरणात मिरा-भाईंदर वसई-विरार आयुक्तालय गुन्हे शाखा कक्ष १ युनिट काश्मीरा यांनी ही कारवाई केली आहे. या आरोपीवर मुंबई, ठाणे, पालघर, वसई-विरारसह अन्य भागांत १८ च्या वर गुन्हे दाखल आहेत.
कल्पेश गोपीनाथ देवधरे (वय ३०) असे या विकृत आरोपीचे नाव असून, याला नालासोपारा येथून अटक केली आहे. हा मूळचा रायगड-श्रीवर्धन या ठिकाणाचा रहिवासी असून मुंबईच्या विविध परिसरात राहत होता. पेशाने वाहनचालक असून, बदलीने वाहनावर जात होता. या आरोपीने १८ एप्रिल रोजी एका नऊ वर्षांच्या मुलीशी अश्लील वर्तन केले होते. या प्रकरणात मिरा रोड नयानगर पोलिस ठाण्यात भादंवि कलम ३७६ सह पोस्को कलम ८ अन्वये गुन्हा दाखल झाला होता. तांत्रिक घटनेचा आधार घेऊन आरोपीला पोलिसांनी नालासोपारा येथून अटक केली असता त्याने विविध पोलिस ठाण्यांतील १८ गुन्ह्यांची कबुली दिली आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81192 Txt Thane
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..