सिंधूताईंच्या नऊ लेकींचा साखरपुडा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सिंधूताईंच्या नऊ लेकींचा साखरपुडा
सिंधूताईंच्या नऊ लेकींचा साखरपुडा

सिंधूताईंच्या नऊ लेकींचा साखरपुडा

sakal_logo
By

मुंबई, ता. ४ ः दिवंगत समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांच्या नऊ लेकींच्या साखरपुड्याचा कार्यक्रम पुण्याच्या कुंभारवळण येथील ममता बाल सदनमध्ये मोठ्या उत्साहात नुकताच पार पडला. हयातीत असताना आपल्या लेकींचे थाटात लग्न पार पडावे, असे स्वप्न सिंधुताईंनी बघितले होते. आज माई नसल्या तरी ममता बाल सदनने त्यांचे स्वप्न मात्र सत्यात उतरवले आहे.

लहानाचे मोठे होईपर्यंत सांभाळलेल्या आपल्या लेकींना विवाहाच्या बंधनात अडकतानाचे स्वप्न साकार होत आहे. आज सिंधुताई नसताना त्यांच्या पश्चात नऊ लेकींना आयुष्याचे जोडीदार मिळाले आहेत. संस्थेच्या वतीने विधिवत पूजापाठसह साखरपुड्याचे नियोजन करण्यात आले. माईंच्या नऊ मानस कन्यांच्या मामांनी उपवर मुलांच्या मामांचे संस्कृतीप्रमाणे यथोचित सन्मान केला. यावेळी आमदार संजय जगताप यांच्या सौभाग्यवती राजवर्धिनी जगताप, माजी राज्यमंत्री विजयबापू शिवतारे यांची कन्या ममता शिवतारे, पंचायत समिती सदस्य सुनीताताई कोलते, चिंतामणी हॉस्पिटल सासवड येथील डॉ. वांढेकर, डॉ. वाघोलीकर, डॉ. रावळ, कुंभारवळणचे सरपंच अश्विनी खळदकर, माजी सरपंच अमोल कामठे, देविदास कामठे यांच्यासह पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थांनी उपस्थित राहून मुलींना आशीर्वाद दिले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81193 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top