मशिदींसह मंदिरांचेही भोंग्यासाठी अर्ज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मशिदींसह मंदिरांचेही 
भोंग्यासाठी अर्ज
मशिदींसह मंदिरांचेही भोंग्यासाठी अर्ज

मशिदींसह मंदिरांचेही भोंग्यासाठी अर्ज

sakal_logo
By

मुंबई, ता. ४ ः राज ठाकरे यांच्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर भोंगे लावण्यासाठी मशिदींबरोबरच मंदिर प्रशासनाकडूनही रीतसर अर्ज येत आहेत. गेल्या काही दिवसांपासून पोलिस आयुक्तालयात परवानगीसाठी अर्जांची संख्या वाढली आहे. आतापर्यंत शहरातील विविध २८ मंदिरांकडून अर्ज आले असून त्यापैकी २० मंदिरांना भोंगे लावण्याची परवानगी देण्यात आली. तसेच मुंबईतील जवळपास ८० टक्के मशिदींनी भोंगे लावण्यासाठी अधिकृत परवानगी घेतली आहे.

मुंबईत एकूण २४०४ मंदिरांची अधिकृत नोंद आहे. मंगळवारपर्यंत भोंग्यांच्या परवानगीसाठी मंदिरांकडून २८ अर्ज आले आहेत. दुसरीकडे मुंबईत ११४४ अधिकृत मशिदी असून त्यातील ९४४ मशिदींनी भोंग्यांच्या परवानगीसाठी रीतसर अर्ज केले आहेत. त्यापैकी ९२२ मशिदींना आतापर्यंत परवानगी देण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार धार्मिक स्थळांना भोंगे लावण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. भोंगे लावताना ध्वनिप्रदूषणाच्या सर्व नियमांचे पालन करणे बंधनकारक असल्याचे पोलिसांनी सांगितले.
...
मनसे कार्यकर्त्यांवर दंडात्मक कारवाई
मुंबईत चारकोप आणि चांदिवली येथे मशिदींसमोर हनुमान चालिसा लावणाऱ्या मनसेच्या दोन कार्यकर्त्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. या दोघांवरही प्रत्येकी १२०० रुपये दंडाची कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलीसांनी दिली.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81200 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top