पाम बीच मार्गावर अपघातात दोघे तरुण ठार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पाम बीच मार्गावर अपघातात दोघे तरुण ठार
पाम बीच मार्गावर अपघातात दोघे तरुण ठार

पाम बीच मार्गावर अपघातात दोघे तरुण ठार

sakal_logo
By

नवी मुंबई, ता. ४ (वार्ताहर): वाशीहून पाम बीच मार्गे बेलापूरच्या दिशेने जाणारी भरधाव होंडा कार रस्ता दुभाजकाचे रेलिंग तोडून पाम वृक्ष व इलेक्ट्रिक पोलवर धडकून पलटी झाल्याने कारमधील दोघे तरुण जागीच ठार; तर कारचालक तरुण गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवारी पहाटे नेरूळ येथील अक्षर चौकाजवळ घडली. अतिवेगाने कार चालवल्याने हा अपघात झाल्याचे आढळून आले असून एनआरआय पोलिसांनी या अपघातातील जखमी कारचालकावर गुन्हा दाखल केला आहे.
या अपघातात मृत झालेल्यांमध्ये श्रेयस ठोसर आणि हर्षल हटकर या दोघांचा समावेश असून जखमी झालेल्या कारचालकाचे नाव नितीन मॅथ्यू असे आहे. हे तिघेही मित्र बुधवारी पहाटे ३.१५ वाजण्याच्या सुमारास वाशीहून पाम बीचमार्गे बेलापूरच्या दिशेने जात होते. या वेळी त्यांची कार अक्षर सिग्नलजवळ आली असताना कारचालकाचे कारवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे कार रस्ता दुभाजकामधील संरक्षक रेलिंग तोडून पामच्या झाडावर तसेच इलेक्ट्रिक पोलवर धडकून पलटी झाली. या भीषण अपघातात श्रेयस ठोसर आणि हर्षल हटकर हे दोघे जागीच ठार झाले; तर कारचालक नितीन मॅथ्यू गंभीर जखमी झाला. त्यामुळे त्याला बेलापूर येथील अपोलो हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. या अपघातात नितीन मॅथ्यू याचे दोन्ही पाय निकामी झाले आहेत. अद्याप तो शुद्धीत नसल्याने हे तिघे इतक्या पहाटे कुठून येत होते, तसेच ते कुठे जात होते हे अद्याप समजू शकलेले नाही. अतिवेगाने असलेल्या कारवरील नियंत्रण सुटून हा अपघात झाल्याचे आढळून आल्याने एनआरआय पोलिसांनी या अपघातातील जखमी कारचालकावर गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81201 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top