निवडणूक प्राधिकरणाची एसटी बँकेला नोटीस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निवडणूक प्राधिकरणाची 
एसटी बँकेला नोटीस
निवडणूक प्राधिकरणाची एसटी बँकेला नोटीस

निवडणूक प्राधिकरणाची एसटी बँकेला नोटीस

sakal_logo
By

मुंबई, ता. ४ ः एसटी बँकेच्या निवडणुकीची सध्या धावपळ सुरू आहे; मात्र एसटीचे कर्मचारी थकबाकीदार असल्याने बँक प्रशासनाने निवडणूक पुढे ढकलण्यासाठी निवडणूक प्राधिकरणाला पत्र पाठवले होते. त्यानंतर आता निवडणूक प्राधिकरणाने बँकेच्या सभासदांची प्राथमिक माहितीसाठी बुधवारी(ता. ४) नोटीस बजावली. त्यानंतर आता ९ मेपर्यंत आता ही माहिती निवडणूक प्राधिकरणाला सादर करावी लागणार आहे.
एसटी कर्मचारी पाच महिने संपावर असल्याने कर्मचाऱ्यांवर कर्जाचे हप्ते थकले आहेत. त्यामुळे सहकारी संस्था अधिनियमानुसार थकबाकीदारांना मतदानामध्ये मतदान करण्याचे अधिकार नसल्याने बँकेची निवडणूक अडचणीत सापडली आहे. मतदारांच्या याद्या तयार करताना केवळ ३० टक्केच मतदार मतदानास पात्र आहेत; मात्र सुमारे ७० टक्के सभासद थकबाकीदार असल्याने मतदानासाठी अपात्र ठरत असल्याने बँकेची निवडणूक पुढे ढकलण्याच्याही हालचाली सुरू आहेत.
त्यामुळे निवडणूक प्राधिकरणाने सध्या एकूण सभासद संख्या, शाखा, थकबाकीदारामुळे अपात्र सभासद किती आणि पात्र मतदार किती यासंदर्भातील माहिती आता बँक प्रशासनाकडून निवडणूक प्राधिकरणाला प्राप्त झाल्यानंतर निवडणूक प्राधिकरणाकडून बँकेच्या निवडणुकीसंदर्भात ठोस निर्णय होण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81202 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top