
कल्याण पश्चिमेच्या काही भागात ५ आणि ६ मे रोजी वीज बंद
कल्याण पश्चिमेच्या काही भागात ५ आणि ६ मे रोजी वीज बंद
कल्याण, ता. ४ (बातमीदार) : वीज वितरण यंत्रणेच्या नियोजित देखभाल-दुरुस्तीसाठी कल्याण पश्चिम विभागातील काही भागांचा वीजपुरवठा गुरुवार व शुक्रवारी (५ व ६ मे) काही काळ बंद ठेवण्यात येणार आहे. संबंधित भागातील वीजग्राहकांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर पूर्वसूचना देणारे संदेश पाठवण्यात आले असून याची नोंद घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.
२२ केव्ही स्पोर्टस कॉम्प्लेक्स उपकेंद्रातून निघणाऱ्या अन्नपूर्णा फिडरवरील रमाबाई आंबेडकर नगर, आधारवाडी चौक, संभाजीनगर, पवारनीचा पाडा, गायकरपाडा, रॉयल रेसिडेन्सी, इंद्रप्रस्थ, मेघ मल्हार, नम्रता हाइट्स, गजानंद महाराज चौक, गणेश-गौरी, स्काय व्हिला, मंगेशीधाम, गोल्डन पार्क, न्यू मनीषा नगर, बेतुरकर पाडा, स्वानंदनगर, भोईर कॉलनी, धोबीघाट, काळा तलाव, मच्छीमार सोसायटी, ठाणकरपाडा, हिना पार्क, शंकेश्वर दर्शन, पंचमुखी राम मंदिर, बालगोपाल रेसिडेन्सी, जुना मनीषा नगर भागात गुरुवारी (५ मे) सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत वीजपुरवठा बंद राहील.
१००/२२ केव्ही मोहने उपकेंद्रातून निघणाऱ्या मोहने-१२ फिडरवरील मोहनेगाव, गाळेगाव, जेतवन नगर, फुलेनगर, यादवनगर, सहकारनगर, बाजारपेठ, आरएस टेकडी, एनआरसी कॉलनी, धम्मदीपनगर भागात शुक्रवारी (६ मे) सकाळी १० ते दुपारी ४ वाजेपर्यंत वीजपुरवठा खंडित राहणार असल्याने नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81205 Txt Thane
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..