मनसुख हिरेन हत्या कटाचा खरा सूत्रधार प्रदीप शर्मा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मनसुख हिरेन हत्या कटाचा खरा सूत्रधार प्रदीप शर्मा
मनसुख हिरेन हत्या कटाचा खरा सूत्रधार प्रदीप शर्मा

मनसुख हिरेन हत्या कटाचा खरा सूत्रधार प्रदीप शर्मा

sakal_logo
By

मुंबई, ता. ४ : अँटेलिया स्फोटक प्रकरणातील व्यावसायिक मनसुख हिरेन हत्या कटाचा खरा सूत्रधार माजी पोलिस अधिकारी प्रदीप शर्मा आहे. बडतर्फ पोलिस निरीक्षक सचिन वाझेने त्याला तब्बल ४५ लाख रुपयांची सुपारी दिली होती, असा खळबळजनक दावा आज एनआयएने मुंबई उच्च न्यायालयात केला आहे.

विशेष म्हणजे पोलिस आयुक्तालय परिसरात अन्य आरोपींच्या मदतीने शर्माने कारस्थान रचले होते. मागील वर्षी घडलेल्या घटनेत ५ मार्चला हिरेन यांचा मृतदेह ठाणे खाडीत पोलिसांना आढळला होता. एनआयएने दाखल केलेल्या आरोपपत्रात शर्मा त्या हत्येचा मास्टरमाईंड असल्याचे म्हटले आहे. त्यासाठी अनेकदा पोलिस आयुक्तांच्या कार्यालय परिसरातच अनेक बैठका घेण्यात आल्या. वाझेने त्या कामासाठी त्याला सुमारे ४५ लाख रुपये दिल्याचा दावा आरोपपत्रात करण्यात आला आहे.

शर्मा सध्या न्यायालयीन कोठडीत आहे आणि त्याने न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला आहे. त्या अर्जावर एनआयएने बाजू मांडली असून जामिनाला विरोध केला आहे. त्यावर १७ मे रोजी पुढील सुनावणी न्यायालयाने निश्चित केली आहे.

ॲटेलिया स्फोटक प्रकरणात सचिन वाझे प्रमुख आरोपी असून अनेक पोलिस कर्मचारी अटकेत आहे. स्फोटके सापडलेली स्कॉर्पिओ गाडी हिरेन यांच्या ताब्यात होती. ठाण्यातील व्यावसायिक म्हणून हिरेन प्रचलित होते आणि वाझेशी त्यांचे हितसंबंध होते, असा दावा पोलिस यंत्रणेने केला आहे.


एनआयएचे दावे
- प्रदीप शर्मा मनसुख हिरेन हत्येमागचा मास्टरमाईंड
- मनसुख हिरेन यांचा खून करण्यासाठी ४५ लाखांची सुपारी
- खुनाचा कट मुंबई पोलिस आयुक्तालयाच्या आवारात शिजला
- प्रदीप शर्माने हत्येसाठी मारेकऱ्याला नियुक्त केले
- हत्येनंतर मारेकऱ्याला नेपाळला पळून जाण्याच्या प्रदीप शर्माच्या सूचना

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81207 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top