अतिक्रमणाच्या विरोधात महिलेचे उपोषण तिसऱ्या दिवशीही उपोषण सुरूच | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अतिक्रमणाच्या विरोधात महिलेचे उपोषण 
तिसऱ्या दिवशीही उपोषण सुरूच
अतिक्रमणाच्या विरोधात महिलेचे उपोषण तिसऱ्या दिवशीही उपोषण सुरूच

अतिक्रमणाच्या विरोधात महिलेचे उपोषण तिसऱ्या दिवशीही उपोषण सुरूच

sakal_logo
By

अंबरनाथ, ता. ५ (बातमीदार) ः पाण्याचा निचरा होण्यासाठी ठेवण्यात आलेल्या एक लहानशा गल्लीत अतिक्रमण केल्याने एका विधवा महिलेने सुरू केलेले उपोषण चौथ्या दिवशीही सुरू आहे. या प्रश्नावर तोडगा काढण्यात अंबरनाथ नगरपालिकेला अपयश आले आहे.
सुनीता मिश्रा राहत असलेल्या ठिकाणी पावसाळी पाण्याचा निचरा होण्यासाठी
लहानशी गल्ली ठेवण्यात आली होती. मात्र सुनीता यांच्या शेजाऱ्यांनी या गल्लीला लागूनच दुमजली घर बांधण्याचे काम सुरू केले. घराची भिंत पाणी वाहून जाण्यासाठी ठेवलेल्या गल्लीतच उभारल्याने शेजाऱ्यांसोबत सुनीता यांचा वाद निर्माण झाला. त्यामुळे सुनीता यांनी पालिका प्रशासनाकडे याबाबतची तक्रार केली. तक्रारीची दखल घेत पालिका प्रशासनाने या ठिकाणी कारवाईसाठी पथक पाठवले. मात्र, पालिकेचे पथक कारवाई न करता पुन्हा माघारी फिरले. पालिका कारवाई करत नसल्याने कारवाईच्या मागणीसाठी सुनीता या सोमवार (ता.२) पासून उपोषणाला बसल्या आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81214 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top