धारावीतील ओएनजीसी नाल्यात कचरा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

धारावीतील ओएनजीसी नाल्यात कचरा
धारावीतील ओएनजीसी नाल्यात कचरा

धारावीतील ओएनजीसी नाल्यात कचरा

sakal_logo
By

धारावी, ता. ५ (बातमीदार) : धारावी लूप रस्त्यावरील राजीव गांधीनगरमधून ओएनजीसी नाला वाहतो. या नाल्यातून राजीव गांधीनगर, काळा किल्ला परिसरातील अनेक वस्त्यांमधील सांडपाणी मिठी नदी व माहीम खाडीत सोडले जाते. या नाल्यात जागोजागी कचरा जमा झाला आहे. दर पावसाळ्यात मिठी नदी व खाडी परिसरात वसलेल्या राजीव गांधीनगरमध्ये पाणी शिरते. जर वेळेत नालेसफाई झाली नाहीतर नाल्याच्या आजूबाजूला असलेल्या घरांना याचा धोका संभवतो. मे महिना उजाडला तरी नालेसफाईस सुरुवात झाली नसल्याने स्थानिक रहिवासी चिंता व्यक्त करत आहेत. शेकडो परिवारांना याचा फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नालेसफाईला लवकरात लवकर सुरुवात केली जावी, अशी मागणी होत आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81220 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top