राज ठाकरेंचे आंदोलन म्हणजे एक्सपायरी डेट संपलेले मुद्दे : अस्लम शेख | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अस्लम शेख
कायदा हातात घेतल्यास कठोर कारवाई करणार

राज ठाकरेंचे आंदोलन म्हणजे एक्सपायरी डेट संपलेले मुद्दे : अस्लम शेख

sakal_logo
By

मालाड, ता. ४ (बातमीदार) ः राज ठाकरे यांचे आंदोलन म्हणजे एक्सपायरी डेट संपलेल्या नेत्याने एक्सपायरी डेट संपलेले मुद्दे घेऊन केलेले आंदोलन आहे, अशा शब्दांत मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी राज ठाकरे यांच्या भूमिकेचा खरपूस समाचार घेतला. कायदा हातात घेतल्यास कठोर कारवाई केली जाईल, असेही ते म्हणाले. भोंग्यांच्या प्रकरणावरून ते मालाड कार्यालयात माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते.

मंत्री अस्लम शेख पुढे म्हणाले की, स्वत:ला हिंदुत्ववादी म्हणवून घेणाऱ्या राज ठाकरे यांना गंगेत तरंगणारी हिंदूंची प्रेते का दिसली नाहीत? बेरोजगारीने बेजार झालेला, महागाईने होरपळून निघणारा हिंदू का दिसत नाही? उत्तर भारतीय व बिहारींची डोकी फोडत होतात ते उत्तर भारतीय व बिहारी हिंदू नव्हते का? स्वत:च्या राजकीय पक्षाचे अस्तित्व संपले आहे, याची जाणीव त्यांना झाली आहे. त्यामुळे ते आता भारतीय जनता पार्टीचे डिलिव्हरी बॉय म्हणून सेवा देत आहेत. कार्यकर्त्यांनी मार खावा, केस अंगावर घ्याव्या, यांचे नेते मात्र पोलिसांना गाडीने उडवून पळून जाणार, कार्यकर्त्यांना केस लढण्यासाठी स्वत:च्या पत्नीचे मंगळसूत्र विकावे लागते, तेव्हा वातानुकूलित दालनांमध्ये बसून आदेश देणारे वाचवायला येत नाहीत, असेही ते म्हणाले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81222 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top