वाहतूक कोंडीमुळे नेरूळकर त्रस्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वाहतूक कोंडीमुळे नेरूळकर त्रस्त
वाहतूक कोंडीमुळे नेरूळकर त्रस्त

वाहतूक कोंडीमुळे नेरूळकर त्रस्त

sakal_logo
By

नेरूळ, ता. ५ (बातमीदार) : शहरात दिवसेंदिवस वाहनांची वर्दळ वाढत आहे. पार्किंगसोबत वाहतूक कोंडीची समस्यादेखील निर्माण झाली आहे. महापालिकेच्या माध्यमातून नेरूळ विभागात अनेक चौकांचे काँक्रिटीकरण, तसेच कामासाठी रस्ते खोदले. त्यामुळे सकाळी आणि सायंकाळी वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. नेरूळ येथील एल पी जंक्शनवरून वाहनांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. तसेच डी. वाय. पाटील स्टेडियममध्ये सुरू असलेल्या आयपीएल सामन्यांमुळे या विभागात मोठ्या प्रमाणात वाहनांची संख्या वाढली आहे. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी या ठिकाणी सिग्नल यंत्रणा बसवली आहे; परंतु तांत्रिक कारणांमुळे अनेक वेळा ती बंद पडत असल्याने वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे. सिग्नल चालू नसल्याने मोठ्या प्रमाणात वाहनांची गर्दी होते, अपघात होण्याची भीती मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे लवकरात लवकर यंत्रणा दुरुस्त करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81225 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top