महावितरणच्या सबस्टेशनची दुरवस्था | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महावितरणच्या सबस्टेशनची दुरवस्था
महावितरणच्या सबस्टेशनची दुरवस्था

महावितरणच्या सबस्टेशनची दुरवस्था

sakal_logo
By

बेलापूर, ता. ५ (बातमीदार) : विद्युत सबस्टेशनची दुरवस्था दूर करण्याची लेखी मागणी नवी मुंबई जिल्हा काँग्रेसच्या सचिव विद्या भांडेकर यांनी महावितरणचे कार्यकारी अभियंत्यांकडे केली आहे. नेरूळ सेक्टर ४ परिसरात महावितरणची तीन सबस्टेशन आहेत. या सबस्टेशनच्या माध्यमातून सुविधा मिळत असल्या तरी तेथील बकालपणा, दुरवस्था व अन्य समस्या पाहता सबस्टेशनमुळे स्थानिक रहिवासी त्रस्त झाले आहेत. या सबस्टेशनचे दरवाजे तुटले आहेत. त्यामुळे या ठिकाणी एखादी दुर्घटना घडण्याची भीती आहे. या सबस्टेशनची समस्या दूर करून बकालपणा संपविण्यासाठी संबंधितांना निर्देश देण्याची मागणी विद्या भांडेकर यांनी महावितरणकडे केली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81226 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top