कळंबोली येथील मशिदीवरील भोंगे उतरवले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कळंबोली येथील मशिदीवरील भोंगे उतरवले
कळंबोली येथील मशिदीवरील भोंगे उतरवले

कळंबोली येथील मशिदीवरील भोंगे उतरवले

sakal_logo
By

नवीन पनवेल, ता. ५ (वार्ताहर) : मशिदींवरील भोंग्यांबाबत राज्यभरात गदारोळ सुरू आहे; परंतु कळंबोली पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय पाटील यांच्या शिष्टाईने कळंबोली वसाहतीमधील मशिदीवरील चारपैकी तीन भोंगे उतरवण्यात आले आहेत. एका भोंग्याला परवानगी असून न्यायालयाच्या नियमांचे पालन करून त्यावर अजान दिली जाणार आहे. त्यामुळे कळंबोली येथे बुधवारी (ता. ४) कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडला नाही. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य उपाध्यक्ष महेश जाधव, रायगड उपजिल्हाध्यक्ष प्रवीण दळवी, तसेच कळंबोली शहराध्यक्ष अमोल बोचरे, राहुल चव्हाण व भगवान खताळ यांनी वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय पाटील यांचे आभार मानले. तसेच मशिदीमधील मौलवी व मुस्लिम बांधवांचेही गुलाबपुष्प देऊन आभार मानले. तसेच कामोठेमध्ये असलेल्या तीन मशिदी या आधीपासून भोंगाविरहित आहेत. याही ठिकाणी कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडला नसल्याने मनसे पदाधिकाऱ्यांनी कामोठे पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक स्मिता जाधव यांचा सत्कार केला.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81231 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top