म्हाडामधील सदनिका धारकांना दिलासा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

म्हाडामधील सदनिका धारकांना दिलासा
म्हाडामधील सदनिका धारकांना दिलासा

म्हाडामधील सदनिका धारकांना दिलासा

sakal_logo
By

अंबरनाथ, ता. ५ (बातमीदार) ः अंबरनाथच्या पश्चिम भागातील रहिवाशांना म्हाडातर्फे आकारण्यात येत असलेल्या घरपट्टी आणि पाणी बिलाच्या शुल्कात सूट मिळाल्याने दिलासा मिळाला आहे. यासंदर्भात आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी म्हाडाच्या अधिकाऱ्यांसमवेत झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आला.
म्हाडा कॉलनीमध्ये इमारत क्रमांक १४ आणि १५ मध्ये १६० सदनिका, तसेच चाळीमध्ये ९९६ सदनिका आहेत. चाळीतील सदनिका धारकांकडून २७५ रुपये आणि इमारतीमधील सदनिकाधारकांकडून ४७५ रुपये घरपट्टी आकारण्यात येते. या घरपट्टीच्या रकमेत सूट मिळावी, तसेच पाणी बिलावरील व्याज माफ करावे, अशी मागणी स्थानिक रहिवाशांनी आमदार डॉ. किणीकर यांच्याकडे केली होती.
बैठकीत झालेल्या चर्चेनुसार चाळीतील सदनिकाधारकांकडून २७५ ऐवजी फक्त ७५ रुपये, तसेच म्हाडाच्या दोन मजली असलेल्या इमारतीमधील सदनिकाधारकांकडून ४१७ ऐवजी फक्त २१७ रुपयांप्रमाणे घरपट्टी आकारण्यात येणार आहे. तसेच पाणी बिलावरील व्याज माफ करण्यात आले असून आता केवळ मूळ मुद्दल सदनिकाधारकांना भरावी लागणार आहे. डीम्ड कन्व्हेयन्स करण्यासाठी देय असलेली रक्कम ही म्हाडाकडून माफ करण्यात आली असल्याने या सोसायट्यांच्या डीम्ड कन्व्हेयन्सचा मार्गही मोकळा झाला आहे. चर्चेच्या अनुषंगाने घेण्यात आलेल्या निर्णयामुळे येथील रहिवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.
बैठकीला माजी नगरसेवक सुनील सोनी, म्हाडाचे कार्यकारी अधिकारी अहिरराव, लेखाधिकारी सूर्यवंशी, एमआयडीसी कार्यकारी अभियंता एस. पी. आव्हाड, सोसायटीचे सदस्य महाबळेश्वर कोरगावकर, महादेव सुतार, राजेंद्र पाटील, भांडलकर, तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81232 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top