भिवंडी ते मुंबई सेंट्रल एसटी बस सेवा सुरू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भिवंडी ते मुंबई सेंट्रल एसटी बस सेवा सुरू
भिवंडी ते मुंबई सेंट्रल एसटी बस सेवा सुरू

भिवंडी ते मुंबई सेंट्रल एसटी बस सेवा सुरू

sakal_logo
By

भिवंडी, ता. ५ (बातमीदार) ः कामगारांची नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भिवंडी शहरातील नोकरदार व व्यावसायिक नागरिकांना मुंबई येथे कामासाठी जाण्यासाठी अतिशय त्रास सहन करावा लागत होता. त्यामुळे भिवंडी ते मुंबई सेंट्रल अशी एसटी बस सेवा सुरू करण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत होती. या मागणीला यश आले असून छत्रपती शिवाजी महाराज चौक, भिवंडी ते मुंबई सेंट्रल अशी एसटी बस सेवा बुधवारपासून सुरू करण्यात आली. या एसटी बस सेवेचा प्रारंभ भिवंडी
शिवसेना शहरप्रमुख सुभाष माने यांच्या हस्ते भगवा झेंडा दाखवून करण्यात आला. यावेळी बस आगार व्यवस्थापक डी. टी. साळुंखे, वरिष्ठ लिपीक चंदू जाधव, बस स्थानक प्रमुख गोसावी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81233 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top