पालघरमध्ये सहकारी बँक निवडणुकांचे वारे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पालघरमध्ये सहकारी बँक निवडणुकांचे वारे
पालघरमध्ये सहकारी बँक निवडणुकांचे वारे

पालघरमध्ये सहकारी बँक निवडणुकांचे वारे

sakal_logo
By

विरार, ता. ५ (बातमीदार) : पालघर जिल्ह्यातील सहकार क्षेत्रात काम करणाऱ्या चार सहकारी बँकांच्या निवडणुका कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून रखडल्या होत्या. त्या बँकांच्या निवडणुकीला आता मुहूर्त मिळाला आहे. येत्या जून आणि जुलै महिन्यात या बँकांच्या निवडणुका होणार असून मतदार याद्या अद्ययावत करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. निवडणुका होणाऱ्या बँकांमध्ये वसई विकास सहकारी बँक, वसई जनता सहकारी बँक, बेसिन कॅथॉलिक बँक आणि जव्हार अर्बन आदी बँकांचा समावेश आहे.
वसई तालुक्याला सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक वारसा लाभला आहे. त्याचप्रमाणे येथे सहकाराचे जाळेही मोठ्या प्रमाणात विणले गेले आहे. तालुक्यात सहकार क्षेत्रात तीन मोठ्या बँका कार्यरत आहेत. यामध्ये वसई विकास बँकेची मुदत २७ जुलै २०२० ला संपली होती; तर वसई जनता बँकेची मुदत २४ मे २०२०, बेसिन कॅथॉलिक बँकेची २१ जून २०२०ला मुदत संपली होती. कोरोना संसर्गामुळे या तिन्ही बँकांच्या निवडणुका सतत पुढे ढकलल्या जात होत्या. त्या निवडणुकांना अखेर मुहूर्त मिळाले आहेत. जून आणि जुलै महिन्यात निवडणुका होणार आहेत.
निवडणुकीच्या दृष्टीने लागणाऱ्या मतदार याद्या अद्ययावत करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. सहकार क्षेत्रात काम करणाऱ्या ख्रिश्‍चन समाजाची बँक अशी ओळख असलेल्या बेसिन कॅथॉलिक बँकेची उलाढाल १२ हजार कोटींच्या वर आहे. वाढवळ समाजाची बँक म्हणून ओळख असलेल्या वसई विकास बँकेची दोन हजार ७०० कोटींची, तर वसई जनता बँकेची उलाढाल एक हजार १०० कोटींची आहे. आता निवडणुका होणार असल्याने इच्छुकांनीही मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81237 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top