ज्ञानमंदिरात समूहगान स्पर्धा उत्साहात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ज्ञानमंदिरात समूहगान स्पर्धा उत्साहात
ज्ञानमंदिरात समूहगान स्पर्धा उत्साहात

ज्ञानमंदिरात समूहगान स्पर्धा उत्साहात

sakal_logo
By

कळंबोली, ता. ५ (बातमीदार) : विद्यार्थ्यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत व्यवसाय क्षेत्रात पदार्पण करावे, असे आवाहन राहुल हजारे यांनी केले. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या ज्ञानमंदिर, कळंबोली प्रशाला (२०२१-२२) हे वर्ष रौप्यमहोत्सवी वर्ष साजरे करत आहे. यानिमित्ताने विविध कार्यक्रम, स्पर्धा यांचे आयोजन करण्यात आले होते. विद्यालयात आंतरशालेय समूहगान स्पर्धेचे शुक्रवारी (ता. २९) आयोजन करण्यात आले. या वेळी ते बोलत होते. या स्पर्धेमध्ये एकूण आठ शाळांनी सहभाग घेतला होता आणि एकूण १२६ शिक्षक सहभागी झाले होते. रसिक प्रेक्षकांनी शिक्षकांचे कलागुणांना मनमुरादपणे दाद दिली. ताला-सुराने धुंद झालेल्या या कलादालनात संगीतमय वातावरण निर्माण झाले होते. स्पर्धेचे परीक्षण तबलावादक अजय भाटवडेकर व संगीत विशारद पद्मजा जोशी यांनी केले. या कार्यक्रमाचे अध्यक्षपद प्राध्यापक गोविंद कुलकर्णी यांनी भूषविले. मुख्याध्यापिका रोहिणी गायकवाड, संजना बाईत, प्रियांका फडके, शाला समिती अध्यक्ष देवदत्त भिशीकर, प्रा. गोविंद कुलकर्णी यांचे मार्गदर्शन लाभले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81241 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top