बेवारस वाहनांचा विळखा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बेवारस वाहनांचा विळखा
बेवारस वाहनांचा विळखा

बेवारस वाहनांचा विळखा

sakal_logo
By

घणसोली, ता. ५ (बातमीदार) : घणसोलीत बेवारस वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. यामुळे रस्त्याचा कडेला अनेक वाहने धूळ खात पडल्याने नवी मुंबई महापालिकेच्या स्वच्छ सर्वेक्षणाला डाग लागला आहे.

महापालिकेकडून शहरात सर्वत्र स्वच्छता अभियान सुरू आहे. घणसोली सेक्टर १२, १३ ,१४ परिसरात या बेवारस वाहनांची संख्या जास्त आहे. अशा वाहनांमुळे अस्वच्छता निर्माण होत असून बहुतांश चौकात अशा प्रकारची बेवारस वाहने उभी आहेत. या वाहनांमुळे परिसराचे विद्रूपीकरण होत आहेत. त्याव्यतिरिक्त या गाड्यांच्या सभोवताली मोठ्या प्रमाणात अस्वच्छता पसरलेली असते. रस्त्याचा कडेला उभी असलेली ही वाहने धुळीने माखलेली असतात. तसेच या गाड्यांच्या खाली मोठ्या प्रमाणात कचरा साचलेला असतो.

पालिका हद्दीत मोठ्या प्रमाणात रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या बेवारस वाहनांमुळे शहर विद्रूप होत चालले आहे. विशेष म्हणजे अनेक वेळा या वाहनांमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. रात्रीच्या वेळेस काही जण मद्यप्राशन करण्यासाठी या वाहनांचा वापर करतात. त्याचबरोबर अनेक ठिकाणी ही वाहने कमी रहदारी आलेल्या रस्त्यावर उभी आहेत. यामुळे अनेक अघटित प्रकारदेखील या रस्त्यावर घडण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. बेवारस वाहने केवळ घणसोलीतच नसून नवी मुंबईत प्रत्येक विभागात ही बेवारस वाहने पाहायला मिळतात. धूळ खात पडलेल्या वाहनांचा वाली कोण, असा सवाल परिसरातील नागरिकांना पडला आहे.

रस्त्यावर उभी असलेली वाहने उचलण्यास दिरंगाई होते. एक वाहन धूळ खात दिसले, की इतरही चालक आपली भंगार झालेली अथवा नको असलेली वाहने उभी करतात.
- दत्ता पाटील, रहिवासी

अनेकदा बंद पडलेल्या रिक्षांमध्ये दारू, सिगारेट, नशा करणारे आपली नशा या बंद रिक्षात करतात. यामुळे परिसरातील नागरिकांना या बंद वाहनांचा त्रास होतो.
- सीमा सावळे, रहिवासी

बेवारस वाहनांना महापालिकेमार्फत नोटीस देण्यात येईल. वाहने हटवण्यात आली नाही, तर ती वाहने डम्पिंगला टाकण्यात येतील.
- महेंद्रसिंग ठोके, विभाग अधिकारी, घणसोली

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81243 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top