अंधेरीत घरावर भोंगा लावून हनुमान चालिसा पठण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अंधेरीत घरावर भोंगा लावून हनुमान चालिसा पठण
अंधेरीत घरावर भोंगा लावून हनुमान चालिसा पठण

अंधेरीत घरावर भोंगा लावून हनुमान चालिसा पठण

sakal_logo
By

जोगेश्वरी, ता. ५ (बातमीदार) ः अंधेरी पूर्वेतील साकीनाका परेरावाडी येथे पहाटे मशीद असलेल्या परिसरात घराच्या पत्र्यावर चढून मनसे पदाधिकारी संजय मुळे यांनी बुधवारी (ता. ४) स्वतः हातात भोंगा पकडत अजान सुरू असताना हनुमान चालिसा लावली. याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत साहित्य जप्त करून मनसेच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.
परेरावाडी येथील मशिदीबाहेर पोलिसांचा पहाटेपासून कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला होता. सकाळपासून अंधेरीतून दहा ते बारा व जोगेश्वरीतून दोन मनसे पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. अंधेरी पूर्वेतील साकीनाका आणि पवई पोलिस ठाण्याच्या हद्दीत महेश मराठे, समीर कदम, संजय मुळे, सचिन मुळे, रेनॉल्ड अँथनी, प्रतीक वानखेडे, सूरज निकाळजे यांना अटक करण्यात आली. न्यायालयाने सातही जणांची प्रत्येकी १५ हजारांच्या वैयक्तिक बॉण्डवर सुटका केली.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81246 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top