९० टक्के नवीन माता थकलेल्या आणि अस्थिर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

९० टक्के नवीन माता थकलेल्या आणि अस्थिर
९० टक्के नवीन माता थकलेल्या आणि अस्थिर

९० टक्के नवीन माता थकलेल्या आणि अस्थिर

sakal_logo
By

मुंबई, ता. ५ : प्रौढ व्यक्तींना रात्री आठ तासांची पुरेशी झोप मिळणे आवश्‍यक आहे. नुकत्याच माता झालेल्यांची बाळाच्या संगोपनामुळे झोपमोड होते. परिणामी त्यांना थकवा, अस्थिरता आणि नैराश्याचा त्रास होत असल्याचे ‘बेड्डी-मॉम्सप्रेसो’द्वारे करण्यात आलेल्या सर्वेक्षणातून निदर्शनास आले आहे. दिल्ली, मुंबई, बेंगळुरू व हैदराबाद अशा चार प्रमुख शहरांमध्ये सर्वेक्षण करण्यात आले.

सर्वेक्षणानुसार ९० टक्के मातांनी सांगितले की, त्यांना दिवसाच्या शेवटी थकल्यासारखे व अस्थिर वाटते. ८५ टक्के मातांना वाटते की, त्यांना अधिक तास झोपेची गरज आहे. ७५ टक्के मातांनी आपण दैनंदिन कामांचे व्यवस्थापन करू शकत नाहीत, असे सांगितले. ५३ टक्के मातांनी झोपमोडीसाठी आपल्या नवजात मुलाच्या बाजूला झोपण्याचे कारण सांगितले आहे. ७६ टक्के मातांनी मुलांच्या बाजूला झोपण्याने ते सुरक्षित असल्याची खात्री मिळते, असे सांगितले आहे. मात्र, द अमेरिकन अकॅडमी ऑफ पेडिॲट्रिक्स आणि कॅनेडियन पेडिॲट्रिक सोसायटीसारख्या संस्थांमधील आघाडीच्या डॉक्टरांनी सांगितलेल्या मार्गदर्शक तत्त्वांच्या ते विरोधात आहे. त्यांच्या मते, बाळाचे मॅट्रेसेस आणि वेगळी गादी पालकांच्या खोलीमध्येच बाजूला अत्यंत सुरक्षित असते.

अधिक मदतीची गरज
‘मॉम्सप्रेसो’सोबतच्या सहयोगाने झालेल्या सर्वेक्षणानुसार, नवीन मातांना अधिक मदतीची गरज आहे. झोपमोड झाल्याने त्या अस्थिर होतात. त्याच कारणामुळे आपल्यापैकी प्रत्येकाने वैयक्तिकदृष्ट्या किंवा व्यावसायिकदृष्ट्या योगदान दिले पाहिजे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81256 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top